प्राचार्य डॉ. डी. वाय. जमादार यांचा राष्ट्रीय जनहित पुरस्कार देऊन सन्मानित करतांना कवी, लेखक आणि दिग्दर्शक अनिल म्हमाने सोबत डावीकडून शाहीर सदाशिव निकम, राणी पाटील, कृष्णात पाटील, मदन पवार आणि मान्यवर
कोल्हापूर (प्रतिनिधी) : भारतीय देश लोकशाही तत्त्वप्रणालीने चालणारा देश असून सद्य परिस्थितीमध्ये लोकशाही धोक्यात आणण्याचे काम जोरदारपणे चालू असून जात, धर्माच्या नावाखाली माणसांमध्ये विभागणी केली जात आहे. अशा काळात सजग भारतीय नागरिकांनी एकत्र येऊन ही लोकशाही वाचवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन कवी, लेखक आणि दिग्दर्शक अनिल म्हमाने यांनी केले.
ते अखिल भारतीय जनहित पार्टीच्या वतीने देण्यात येणाऱ्या विविध सामाजिक जनसेवेच्या क्षेत्रात दखलपात्र कार्य करणाऱ्या व्यक्तींना देण्यात येणार्या राष्ट्रीय जनहित पुरस्कार वितरण प्रसंगी राजर्षी शाहू स्मारक म्हणून कोल्हापूर येथे बोलत.
यावर्षी शैक्षणिक, साहित्य, सामाजिक आणि कलेच्या क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल प्राचार्य डॉ. डी. वाय. जमादार, राणी पाटील, डॉ. अॅड. शोभा चाळके, शाहीर रणजित कांबळे आणि डॉ. मिनल राजहंस यांना राष्ट्रीय जनहित पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी मदन पवार, बबनराव रानगे, डॉ. कपिल राजहंस, प्राचार्य डॉ. डी. वाय. जमादार, राणी पाटील, शाहीर रणजित कांबळे, सतीश भंडारे यांची भाषणे झाली. अध्यक्षस्थानी अखिल भारतीय जनहित पार्टीचे अध्यक्ष कृष्णात पाटील होते.
सुप्रिया पाटील, विश्वासराव तरटे, किरण पाटील, ईस्माइल समडोळे, अमित चव्हाण, मारुती माळी, जनार्दन पाखरे, शिवाजी मगदूम, दिलीप दळवी, संतोष सुर्ववंशी, विश्वासराव इंगवले, आंनदराव कांबळे, शाहीर सदाशिव निकम, बापुसो पाटील, सारिका पाटील, सुर्यकांत पिंपळकर, रुपाली कांबळे, डॉ. जयंत कांबळे, राजाराम कांबळे, विश्वास बालीघाटे, सुनिल बारवाडे, हेमंत जाधव, डॉ. सुशांत कांबळे, प्रज्ञा कांबळे, धनंजय पाटील, शिवाजी खोत, प्रा. प्रियांका माळगे, सुखदेव पाटील, कुडंलिक हिरुगडे, सदाशिव कांबळे, रसूल शेख, बाबासाहेब वराळे, वैशाली पाटील, स्मिता कांबळे, सचिन सुतार, अंनंत कुलकर्णी यांना राज्यस्तरीय जनहित पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी सिकंदर तामगावे, प्रमोद कांबळे, जे. के. गोरंबेकर, अमित चव्हाण, दत्तात्रय पाटील, संजय कुरुंदवाडे, सविता पाटील, युवराज शेटे यांच्यासह जनहित पार्टीचे लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. डी. वाय. जमादार यांचा राष्ट्रीय जनहित पुरस्कार देऊन सन्मानित करतांना कवी, लेखक आणि दिग्दर्शक अनिल म्हमाने सोबत डावीकडून शाहीर सदाशिव निकम, राणी पाटील, कृष्णात पाटील, मदन पवार आणि मान्यवर
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या