प्रतिष्ठा न्यूज
कोल्हापूर (प्रतिनिधी) : अखिल भारतीय जनहित पार्टीच्या वतीने देण्यात येणाऱ्या विविध सामाजिक जनसेवेच्या क्षेत्रात दखलपात्र कार्य करणाऱ्या व्यक्तींना राष्ट्रीय जनहित पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. यावर्षी शैक्षणिक, साहित्य, सामाजिक आणि कलेच्या क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल प्राचार्य डॉ. डी. वाय. जमादार, राणी पाटील, डॉ. अॅड. शोभा चाळके, गिरीश फोंडे, शाहीर रणजित कांबळे आणि डॉ. मिनल राजहंस यांना राष्ट्रीय जनहित पुरस्कार जाहीर झाला असल्याची माहिती अखिल भारतीय जनहित पार्टीचे अध्यक्ष कृष्णात पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
लेखक, प्रकाशक व दिग्दर्शक अनिल म्हमाने यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या पुरस्कार वितरण समारंभास अॅड. करुणा विमल, मदन पवार, बबनराव रानगे, संजयकुमार अर्दाळकर, डॉ. अस्मिता प्रधान यांची सन्माननीय उपस्थिती असणार आहे.
यावेळी सुप्रिया पाटील, विश्वासराव तरटे, किरण पाटील, ईस्माइल समडोळे, अमित चव्हाण, मारुती माळी, जनार्दन पाखरे, शिवाजी मगदूम, दिलीप दळवी, संतोष सुर्ववंशी, विश्वासराव इंगवले, आंनदराव कांबळे, शाहीर सदाशिव निकम, बापुसो पाटील, सारिका पाटील, सुर्यकांत पिंपळकर, रुपाली कांबळे, डॉ. जयंत कांबळे, राजाराम कांबळे, विश्वास बालीघाटे, सुनिल बारवाडे, हेमंत जाधव, डॉ. सुशांत कांबळे, प्रज्ञा कांबळे, धनंजय पाटील, शिवाजी खोत, प्रा. प्रियांका माळगे, सुखदेव पाटील, कुडंलिक हिरुगडे, सदाशिव कांबळे, रसूल शेख, बाबासाहेब वराळे, वैशाली पाटील, स्मिता कांबळे, सचिन सुतार, अंनंत कुलकर्णी यांना राज्यस्तरीय जनहित पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
पत्रकार परिषदेला प्रमोद कांबळे, जे. के. गोरंबेकर, अमित चव्हाण, दत्तात्रय पाटील, संजय कुरुंदवाडे, सविता पाटील, युवराज शेटे उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या