प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:माजी खासदार संजयकाका यांचे राजकारण संपविण्याचा प्रयत्न काही मंडळींनी सुरू केला होता,परंतु
तासगांव नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जनतेला खरे काय व खोटे काय हे समजले असून सत्य-असत्याचा फैसला होऊन शेवटी सत्याचा विजय झाला,गेल्या दोन निवडणुकीतील झालेल्या पराभवाची मरगळ झटकून ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांच्या होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका पूर्ण ताकतीने लढवून यश संपादन केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे प्रतिपादन युवा नेते प्रभाकर पाटील यांनी केले.
येळावी जिल्हा परिषद गटातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते.निमणी येथे आर.डी. पाटील यांच्या फार्म हाऊसवर झालेल्या बैठकीत येळावी जिल्हा परिषद गटातील सर्व गावातील प्रमुख नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी स्वागत व प्रास्ताविक निमणीचे माजी उपसरपंच आर डी पाटील यांनी केले.सुरुवातीला युवा नेते प्रभाकर पाटील यांचा सत्कार मतदारसंघातील सर्व ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या हस्ते करण्यात आला.तासगावच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष सौ विजया बाबासाहेब पाटील यांचा निमणीच्या सरपंच सौ.रेखा रविंद्र पाटील व उपस्थित महिलांच्या हस्ते औक्षण करून सत्कार करण्यात आला.ए.आय.टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून कमी क्षेत्रात ऊसाचे अधिक उत्पादन घेतल्याबद्दल निमणीचे प्रगतशील शेतकरी शिवाजी राजमाने यांचा सत्कार प्रभाकर पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी आर डी पाटील म्हणाले खासदारकीच्या दहा वर्षाच्या कालावधीत केंद्र व राज्य सरकार यांच्या माध्यमातून जिल्ह्यात केलेल्या हजारो कोटींच्या विकास कामांची माहिती प्रसिद्धी करण्यात आपण कमी पडलो,काही मंडळी काम न करता प्रसिद्धी माध्यमातून केवळ श्रेय वाद करण्यातच धन्यता मानत आहेत.यावेळी उपस्थित असलेल्या सर्वच गावातील प्रमुख कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.माजी खासदार संजयकाका व प्रभाकरबाबा देतील त्या आदेशानुसार जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांना पुर्ण क्षमतेने सामोरे जाण्याची सर्व कार्यकर्त्यांची तयारी असल्याची ग्वाही यावेळी सर्वांनी दिली.माजी खासदार संजयकाका पाटील यांनी गाववार सर्व कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा करीत संवाद साधला.यावेळी संजयकाकांनी द्राक्ष बागांच्या झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला.शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा लढा या पुढच्या काळात आणखी तीव्र करण्यात येईल असे सांगितले.यावेळी येळावीचे माजी पंचायत समिती सदस्य उमेश पाटील, हेमंत पाटील,अमर पाटील,बापूसाहेब गवळी,बेंद्रीचे सुभाष पाटील,निलेश पाटील,सचिन जाधव,तुरचीचे आबासाहेब तांदळे,गणेश पाटील, संतोष पाटील,जुळेवाडीचे विजय खोत,पवन जाधव,सुभाष जाधव, चंद्रकांत खोत,दिनकर जाधव,नितीन मंडले,अनिल पाटील,नागावचे सोसायटीचे चेअरमन दिलीप पाटील, ज्ञानेश्वर पाटील,अनिल पाटील,राजापूरचे विकास सोसायटीचे चेअरमन राजेसो बंडू शेख,अर्जुन पाटील,वसंत पवार,गणेश पाटील, हनमंत पाटील,माणिक पाटील,संदीप पाटील,विजय पाटील,दिलीप गाडे वासुंबेचे मारुती एडके,सागर खराडे, संभाजी कांकर,बाळासाहेब शेळके,दिपक भोसले,नेहरूनगरचे पोपटराव पाटील,सुरेश पाटील,बाळासाहेब पाटील,राजेंद्र भोसले,प्रदीप मोकाशी,शिवाजी कदम,भारत मोरे,अमित देवकुळे,सुर्यकांत भोसले,रामलिंग मोकाशी,अरुण माने,वसंत भोसले,निमणीचे शिवगोंडा पाटील,शरद पाटील,गणेश पाटील,आप्पासाहेब पाटील, रंगाआप्पा गायकवाड,दिलीप लुगडे,उदय पाटील,युवराज पाटील, राहुल पाटील,सतिश बुचडे,अनिल सुखदेव,युवराज सुखदेव,श्याम बुधावले यांच्या सह असंख्य प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.शेवटी राजगौंडा पाटील यांनी आभार मानले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या