तासगाव : तासगाव नगरपालिकेत माजी खासदार संजयकाका पाटील यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी विकास आघाडीने नगराध्यक्ष व १३ नगरसेवक निवडून आणून सत्ता काबीज केली.माजी खासदार संजयकाका पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नुतन नगराध्यक्षा सौ. विजया बाबासो पाटील व नगरसेवकांनी नगरपालिकेत जाऊन पदभार स्विकारला.यावेळी नूतन नगराध्यक्षा यांच्या दालनामध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज व माजी खासदार संजयकाका पाटील यांची प्रतिमा लावलेली संजयकाकांच्या निदर्शनास आली.तेव्हा त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता नूतन नगराध्यक्षा यांचे पती व माजी नगराध्यक्ष बाबासाहेब पाटील यांना स्वत:च्या प्रतिमेसोबतच माजी उपमुख्यमंत्री व गृहमंत्री दिवंगत स्व.आर.आर.आबा पाटील यांचीही प्रतिमा लावण्याबाबत निर्देश दिले. बाबासाहेब पाटील यांनीही लगेच स्व. आर.आर.आबा पाटील यांची प्रतिमा बनवून आणण्यासाठी कार्यकर्त्यांना सांगितले.यावेळी संजयकाका पाटील म्हणाले,स्व.आर.आर.आबा पाटील यांनी राज्यात तासगावचे नेतृत्व केलेले आहे.मतदारसंघातील त्यांचेही योगदान मोलाचे आहे.त्यामुळे त्यांची प्रतिमाही नगराध्यक्ष दालनात असणे महत्वाचे आहे.यातून नगरपालिकेची सत्ता ही जिरवाजिरवीची व चढाओधीची नसून सर्वांना सोबत घेवून विकासात्मक दृष्टीकोन ठेवून पुढे शहराचा सर्वांगिण विकास करणेसाठी असणार आहे,असे प्रतिपादनही त्यांनी केले.माजी खासदार संजयकाका पाटील यांनी विरोधी गटाची सत्ता आलेली नसतानाही स्व.आर.आर.पाटील यांचा फोटो नगराध्यक्ष दालनात लावणेसाठी निर्देश देवून राजकारणात द्वेष व मत्सरापेक्षा राजकीय संस्कार व कर्तव्य महत्वाचे असते,हेच कृतीतून दाखवून दिले आहे.यापूर्वीही तासगाव नगरपालिकेच्या नुतन इमारतीतील सभागृहास माजी खासदार संजयकाका पाटील यांचे नाव देण्याचा ठराव झालेला असतानासुद्धा त्यांनी सभागृहास 'सर्कससिंह कै. परशुराम माळी' यांचे नाव देवून एक वेगळा आदर्श घालून दिला होता.या माजी खासदार संजयकाका पाटील यांच्या या निर्णयातून निवडणूक व राजकारण एका बाजूला आणि कर्तव्य व संस्कार एका बाजूला असतात हे दाखवून दिले आहे. त्यांच्या या निर्णयाचे तासगावकरां कडून समाधान व्यक्त होत आहे.
तासगाव नगराध्यक्षांच्या दालनात लागणार आर.आर.आबांचाही फोटो ; संजय काकांच्या भूमिकेने अनेकांच्या भुवया उंचावल्या..
By -
डिसेंबर २६, २०२५
0
प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या