प्रतिष्ठा न्यूज/योगेश रोकडे
मिरज : देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी श्री गुरु गोविंदसिंहजी यांच्या प्रकाश पर्वाच्या शुभप्रसंगी देशवासियांना संबोधित करताना, श्री गुरु गोविंदसिंहजी यांचे पुत्र साहिबजादे बाबा जोरावर सिंग व बाबा फतेह सिंग यांच्या शहिदीच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी २६ डिसेंबर हा दिवस “वीर बाल दिवस” म्हणून साजरा करण्याची घोषणा केली आहे. या घोषणेनुसार सांगली भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा स्वातीताई सुशांत खाडे यांच्या माध्यमातून “वीर बाल दिवस” कार्यक्रमाचे आयोजन मिरजेच्या गुरुद्वारात करण्यात आले. कार्यक्रमात वीर बालकांच्या अद्वितीय शौर्य, त्याग व बलिदानाचा गौरव करण्यात आला. उपस्थितांनी साहिबजाद्यांच्या बलिदानातून मिळणाऱ्या देशप्रेम, आत्मसन्मान, धैर्य व नीतिमूल्यांची प्रेरणा आत्मसात करावी, असा संदेश माताजी गुरुप्रीतकौर यांच्याकडून देण्यात आला.
या प्रसंगी शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी मुख्याध्यापिका संगीता पाटील, भाजपा पदाधिकारी स्वाती ताई खाडे , संगीता खोत, अनिता हारगे, रसिका ताई खाडे, सुरेखा कदम, साधना माळी, सारिका राहुटे, प्राची फाटक, मधोमधी गाढवे, ज्योती मगदूम, रेखा शेजवळ, शोभा गाडगीळ, अनघा कुलकर्णी, उज्वला चौगुले तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमामुळे उपस्थितांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना अधिक दृढ होण्यास मदत झाली.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या