तासगाव :संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालय तासगाव येथे मानसिक आरोग्य मार्गदर्शन या विषयावर व्याख्यान आयोजन करण्यात आले. सध्याच्या स्पर्धात्मक व तणावपूर्ण शैक्षणिक वातावरणात भावी शिक्षकांचे मानसिक आरोग्य सक्षम असणे अत्यंत आवश्यक असल्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व प्रतिमापूजनाने करण्यात आली.प्रमुख वक्ते भारती जाधव यांनी मानसिक आरोग्याची संकल्पना,त्याचे महत्त्व व शिक्षकांच्या दैनंदिन जीवनातील उपयोग यावर सविस्तर मार्गदर्शन केले.व्याख्यानात विद्यार्थ्यांमधील ताणतणाव,चिंता, नैराश्य यासारख्या मानसिक आव्हानांवर कसे मात करावी,सकारात्मक दृष्टिकोन कसा विकसित करावा,वेळेचे नियोजन,ध्यानधारणा,योग व आत्मचिंतन यांचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले.शिक्षक म्हणून काम करताना विद्यार्थ्यांच्या भावनिक गरजा ओळखणे,समुपदेशन कौशल्ये आत्मसात करणे आणि सकारात्मक शैक्षणिक वातावरण निर्माण करणे यावरही विशेष भर देण्यात आला.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ लक्ष्मी भंडारे यांनी सांगितले की,मानसिकदृष्ट्या सक्षम शिक्षकच विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करू शकतो.शिक्षकांच्या व्यक्तिमत्त्वाचा थेट परिणाम विद्यार्थ्यांवर होत असल्याने मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही,असेही त्यांनी नमूद केले.प्रश्नोत्तर सत्रात प्रशिक्षणार्थींनी आपले अनुभव, समस्या मांडल्या व त्यावर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळवले.
सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एम.पाटील यांची प्रेरणा मिळाली.या कार्यक्रमासाठी डॉ लक्ष्मी भंडारे प्रा.अंकुश पंडित उपस्थित होते. व बी एड भाग एक व दोन च्या सर्व प्रशिक्षणार्थीनी उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा प्रमोद शेंडगे यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋषाली सूर्यवंशी व सुमेधा सुतार यांनी केले प्रास्ताविक अक्षता शिगावकर यांनी केले तर आभारप्रदर्शन स्वाती साळुंखे यांनी केले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या