सावळज : सावळज(तासगाव) : सावळजसह परिसरातील गावांच्या विकास कामांना निधी कमी पडणार नाही, जनतेने भारतीय जनता पार्टीस साथ द्यावी,असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे तासगाव तालुकाप्रमुख ॲड स्वप्निल पाटील यांनी केले. ते सावळज ता.तासगाव येथे हायस्कूल सुनील मोरे ते कोळी कॉलनी या रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ प्रसंगी बोलत होते.
ॲड पाटील पुढे म्हणाले की, पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगली जिल्हा विकास निधीतून सावळज गावामध्ये संत रोहिदास नगर ,सोसायटी समोर रस्ता कॉंक्रिटीकरण 10 लाख,हायस्कूल सुनील मोरे ते कोळी कॉलनी रस्ता कॉंक्रिटीकरण रुपये सात लाख,श्री रामलिंग मंदिर क वर्ग तीर्थक्षेत्र निधीतून अन्नछत्रासाठी दहा लाख रुपये ,हंकारे वस्ती ते एकविरा नगर रस्ता सहा लाख रुपये ,अनुसूचित जातीसाठी हाय मस्ट सौरदिवे बसवणे 10 लाख,स्वराज चौक ते स्मशानभूमी रस्ता कॉंक्रिटीकरण रुपये 15 लाख ,जोतिबा मंदिर ते म्हसोबा पावटे वस्ती रस्ते कॉंक्रिटीकरण रुपये 15 लाख असा एकूण 71 लाख रुपयांचा विकास निधी दिला आहे. जनतेच्या मागणीप्रमाणे वेगवेगळ्या विकास कामासाठी आणखी निधी उपलब्ध करून दिला जाईल.
या वेळी सावळज गावचे सरपंच संदीप पाटील, उपसरपंच रमेश कांबळे, भाजपा सरचिटणीस प्रशांत कुलकर्णी,बबनराव शिंदे, रवींद्र शिंदे, जरंडी, विश्वास निकम, समर्थ मोहिते, करडे सर,पत्रकार रमेश मस्के,शिवसेनेचे नंदू मंडले, राजू उनवणे आप्पासाहेब चव्हाण, संचालक बाळासाहेब निकम, विलास तोडकर, थोरात,विजय पाटील, पंकज कोळी, शैलेश पाटील,अमित झांबरे, सुनील मोरे, संजय पाटील, प्रफुल्ल पाटील, जयगोंडा पाटील, पोपट हंकारे, सुभाष माळी, आप्पासाहेब निकम तसेच भाजपा पदाधिकारी, रौद्रशंभो मंडळाचे पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान,सावळज जिल्हा परिषद मतदार संघातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी भाजप पदाधिकाऱ्यांची इच्छुकांची बैठक झाली. यामध्ये भारतीय जनता पार्टी जो उमेदवार देईल त्याला निवडून आणण्याचे बैठकी ठरले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या