सांगली : श्रीमंतीबाई कळंत्रे आक्का प्राथमिक विद्यामंदिर, सांगली येथे शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन व विविध गुणदर्शन कार्यक्रम अत्यंत उत्साहात व आनंदी वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास शाळेच्या माजी विद्यार्थिनी माधुरी मेहता (CA) व मानसी करपट्टी (CA) या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शांतीनाथ कांते,चेअरमन, मॅनेजिंग कौन्सिल, लठ्ठे एज्युकेशन सोसायटी हे होते.
यावेळी शाळा समितीचे चेअरमन राहुल पाटील, सदस्य प्रमोद मसुटगे, पा. बा. पाटील,सदस्या सुनिता उपाध्याय, कार्यक्रमाच्या कार्याध्यक्षा शोभा हुलिकिरे, विद्यार्थी प्रतिनिधी सृष्टी हेरले व संस्कार हाबळे, तसेच शाळेचे मुख्याध्यापक शांतीनाथ चौगुले, माजी मुख्याध्यापक मुसा तांबोळी व ज्योती पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमदरम्यान विद्यार्थ्यांनी नृत्य, नाट्य, गीतगायन तसेच विविध सांस्कृतिक सादरीकरणांतून आपल्या कलागुणांचे प्रभावी दर्शन घडविले.उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे भरभरून कौतुक केले.
प्रमुख पाहुण्या माधुरी मेहता व मानसी करपट्टी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना “मोठी स्वप्ने पाहा आणि ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्नांची पराकाष्ठा करा” हा यशाचा मूलमंत्र विद्यार्थ्यांना दिला. कार्यक्रमाचे अध्यक्ष शांतीनाथ कांते यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.
दरम्यान,सांगली–मिरज– कुपवाड शहर महानगर पालिका निवडणुकीचे मतदान दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी होणार असल्याने मतदार जागृतीसाठी विशेष उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी प्रशासन अधिकारी प्रकाश खेडकर, केंद्र समन्वयक रविंद्र शिंदे व इतर मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित नागरिक, शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांनी मतदार जागृती शपथ घेतली तसेच निर्भयपणे व मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले.
या कार्यक्रमास प्रशासनातील अधिकारी, पालकवर्ग व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढविली.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या