सांगली प्रतिनिधी : विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र, कोल्हापूर श्री. सुनिल फुलारी हे दि. २७/१२/२०२५ रोजी आगामी सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सांगली जिल्हा दौऱ्यावर आले होते.
दि. २७.१२.२०२५ रोजी श्री. सुनिल फुलारी, मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र, कोल्हापुर यांनी आगामी महापालीकेच्या निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगानने सांगली जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांची पोलीस अधिक्षक कार्यालय येथे बैठक आयोजित केली होती. सदर बैठकीत मा. आय. जी. सरांनी आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या दरम्यान पोलीस विभागाच्या जबाबदारी व कर्तव्याच्या अनुषंगाने आढावा घेतला त्यात विशेष करुन मा. न्यायालया कडुन प्राप्त समन्स व वॉरंट बजावणी, सांगली जिल्ह्याच्या रेकॉर्ड वरील पाहिजे व फरारी आरोपींचा शोध घेवुन त्यांना अटक करणे, जिल्ह्यातुन तडीपार आरोपी हे परत आल्यास त्यांच्या वरती कारवाई करणे, गंभीर गुन्ह्यातील परागंदा आरोपींचा शोध घेणे, जिल्ह्यातीली स्क्रूटनी कमिटीने शिफारस केलेंले परवानाधारक शस्त्र तात्पुरते जमा करणे, शहरात विविध ठिकाणी वेळा बदलून नाकाबंदी व कोबींग ऑपरेशन आयोजन करणे, महापालिका क्षेत्रात विशेष रात्रगस्त राबविने तसेच गुडमॉर्निंग पथके कार्यान्वित करणे याबाबत आढावा घेवुन मार्गदर्शन केले. तसेच बैठकी दरम्यान मा.आय.जी. सरांनी एफ.एस.टी.व एस.एस.टी.पथकाचे कामकाज, स्टाँगरुम बंदोबस्त, निवडणुक मतदानाच्या दिवशीचा मतदान केंद्रावर लावण्यात येणारा बंदोबस्त, सेक्टर पेट्रोलिक व मतमोजणीच्या दिवशी लावण्यात येणारा बंदोबस्त याबाबत सुध्दा आढावा घेवुन मार्गदर्शनपर सुचना दिल्या. तसेच या पुर्वीच्या विविध निवडणुकीच्या दरम्यान दाखल गुन्ह्यांचा आढावा घेवुन प्रतिबंधक कारवाई करण्याबाबतच्या सुचना दिल्या तसेच नवीन फौजदारी कायद्याच्या अंमलबजावणी बाबतचा हि आढावा घेवुन सुचना दिल्या.
मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापुर परिक्षेत्र, कोल्हापुर श्री. सुनिल फुलारी सर यांनी गुन्हे आढावा बैठकीवेळी सांगली जिल्ह्यात आदर्श आचार संहितेचे पालन करुन कोणताही अनुचीत प्रकार घडणार नाही या बाबत सुचना देवुन योग्य ते मार्गदर्शन केले. सदर बैठकीस पोलीस अधिक्षक श्री. संदीप घुगे, जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सांगली व मिरज कुपवाड हद्दीतील तसेच हद्दीलगदचे सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व पोलीस अधिक्षक कार्यालयातील सर्व शाखा प्रभारी अधिकारी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या