जि प प्रा शा परमोरी येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी भारतरत्न,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन सर्व उपस्थित मान्यवरांनी केले.
साई योगेश दिघे, नंदिनी पंढरीनाथ गांगोडे या विद्यार्थ्यांनी खूपच माहितीपूर्ण भाषण केले.
यावेळी नौशाद सर यांनी भारतरत्न,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाविषयी संपूर्ण माहिती सांगितली.
सोमनाथ दिघे आणि केशव शिवले यांनी अतिशय सुंदर शब्दात मनोगत व्यक्त केले.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नौशाद अब्बास यांनी केले.
यावेळी उपसरपंच दिलीप केदार, जयराम दिघे,शालेय व्यवस्थापन समिती सदस्य केशव शिवले, महेश शिवले, संदीप गांगोडे, माजी उपसरपंच विलास काळोगे,रघुनाथ दिघे,संदीप काळोगे,कचरू काळोगे,सोमनाथ दिघे, छबू गांगोडे, गणेश काळोगे, गणपत काळोगे, शरद काळोगे,हेमंत दिघे, कैलास गांगोडे, काशिनाथ केदार, पिंटू उफाडे,विजय दिघे, वंदेश शेळके,कविता बदादे,भारती ठाकरे, सुनीता विसपुते, शकुंतला रौदळ,बेबी आहिरे, लंका गांगोडे, मंदा शिंदे, ग्रामसेवक बोरसे,व शिक्षण प्रेमी नागरिक, ग्रामपंचायत सदस्य, सर्व कर्मचारी व ग्रामस्थ मोठया संख्येने हजर होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी परमोरी शाळेच्या सर्व शिक्षक वृंदानी यासाठी मेहनत घेतली.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या