प्रतिष्ठा न्यूज / योगेश रोकडे
मिरज: भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा स्वातीताई सुशांत खाडे यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या नियोजन, प्रचार व प्रसाराच्या दृष्टीने घटक पक्षासह महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली. मनपा कार्यालयावर कमळ फुलवण्याच्या उद्देशाने ही बैठक घेण्यात आली.
यावेळी बोलताना स्वातीताई खाडे म्हणाल्या की, महिलांना सक्षम करणारा व नेतृत्वाची संधी देणारा पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष आहे. या पक्षाच्या पाठीशी आपण सर्व ठामपणे उभे आहोत; मात्र येणाऱ्या निवडणुकीत महिलांची संख्या आणि नेतृत्व अधिक वाढवण्यासाठी सर्वांनी सक्रिय व तत्पर राहणे गरजेचे आहे. आगामी महापालिका निवडणुकीत भाजपा महिला मोर्चा अग्रेसर राहील, तसेच मनपा कार्यालयावर कमळ फुलवण्यात महिला मोर्चाचा सिंहाचा वाटा असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.जिल्हाध्यक्षा या नात्याने सर्व महिला पदाधिकारी, कार्यकर्त्या तसेच वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली ही जबाबदारी सक्षमपणे पार पाडण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. तसेच निवडणुकीच्या अनुषंगाने सभा, प्रचार व प्रसाराचे नियोजन नीटनेटके व प्रभावी पद्धतीने करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
या बैठकीस भाजपा जेष्ठ नेत्या सुमनताई खाडे, भारती दिगडे यांच्यासह महिला मोर्चाच्या विविध पदाधिकारी उपस्थित होत्या.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या