प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : एक वर्षापेक्षा जास्त काळ निलंबित असलेल्या व जिल्हा परिषद प्रशासनाने दिलेल्या लिंगनूर तालुका मिरज शाळेवर हजर न होणाऱ्या अविनाश गुरव या शिक्षकाला कमी पटाची, हवी ती शाळा राजकारणासाठी व सांगली-मिरज शहराजवळ हवी असून त्यासाठी राजकीय दबाव आणणाऱ्या शिक्षकास बडतर्फ करा,अशी मागणी दलित महासंघाने शिक्षण आयुक्त पुणे व शिक्षण संचालक पुणे यांचेकडे केली आहे.
शिवाजीनगर निमणी या शाळेत सलग सहा महिने गैरहजर राहिल्यामुळे एक वर्षांपूर्वी अविनाश गुरव या शिक्षकाला निलंबित करण्यात आले होते.
शासन नियमाप्रमाणे त्यांना सहा महिन्यानंतर पुनर्पदस्थापना देऊन शाळा देणे आवश्यक असल्याने प्रशासनाने त्यांना लिंगनूर, तालुका मिरज ही शाळा दिलेली होती.
तथापि राजकारण व राजकीय दबावाच्या पाठिंबावर एक वर्ष सदर शिक्षक कोणत्याही शाळेत हजर राहिलेला नाही. ही गंभीर स्वरूपाची कर्तव्यात कसूर करण्याची प्रवृत्ती असून अविनाश गुरव या शिक्षकास तात्काळ बडतर्फ करावे,किंवा कोणत्याही परिस्थितीत सांगली-मिरज शहराजवळ छोटी शाळा राजकारण करून विद्यार्थ्यांचे नुकसान करण्यासाठी देऊ नये, अन्यथा शिक्षण आयुक्त पुणे यांच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येईल असे निवेदन राष्ट्रीय दलित पॅंथर सेनेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष प्रशांत केदार यांनी शिक्षण आयुक्त यांना निवेदन देऊन कळवले आहे.
राजकीय, आर्थिक पाठबळ व राजकीय दबावातून शिक्षक नेते कशाही प्रकारे प्रशासनास गुडघ्यावर आणू शकतात व त्यांच्याविरुद्ध कोणतीही कारवाई होत नाही,अशी भावना समाजामध्ये पसरू लागली आहे. त्यामुळे प्रशासनाने कठोर भूमिका घेण्याची मागणी जिल्ह्यातून होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या