गगनबावडा : आनंदी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव महाविद्यालय, गगनबावडा यांचे राष्ट्रीय सेवा योजना (NSS) अंतर्गत विशेष श्रमसंस्कार निवासी शिबीर दिनांक २१ ते २७ डिसेंबर २०२५ या कालावधीत बावेली (तालुका गगनबावडा ) येथे यशस्वीपणे पार पडले. या शिबिरात महाविद्यालयातील ५० स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला.
शिबिराच्या सातही दिवसांत सकाळी ८ ते १२ या वेळेत गावातील रस्ते स्वच्छता, गटार सफाई, पाण्याच्या टाकीची स्वच्छता, हायस्कूल मैदान व मंदिर परिसराची स्वच्छता अशी विविध श्रमदानाची कामे करण्यात आली. यामुळे गावात स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण झाली.
दुपारच्या सत्रात विद्यार्थ्यांसाठी विविध विषयांवर गटचर्चा व खेळांचे आयोजन करण्यात आले. तर सायंकाळी ७ ते ९ या वेळेत प्रबोधनात्मक व्याख्याने आयोजित करण्यात आली होती. यामध्ये संस्थेच्या सचिव डॉ. विद्या देसाई, उपप्राचार्य डॉ. एस. एस. पानारी , प्रा. ए. एस. कोळी, गगनबावडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ तसेच आरोग्य अधिकारी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या शिबिरासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई, सचिव डॉ. विद्या देसाई व प्राचार्य डॉ. टी. एम. पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
शिबिराचे यशस्वी आयोजन समन्वयक प्रा. वंदना पाटील, सहसमन्वयक प्रा. अरुण गावकर व प्रा. रोहित सरनोबत यांनी केले.
तसेच या उपक्रमास बावेली गावचे सरपंच मा. युवराज कदम, ग्रामपंचायत सदस्य, महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या शिबिरामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, स्वच्छतेची जाणीव व नेतृत्वगुणांचा विकास झाल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या