प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा तसेच जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांवरील सरकारचा अमानुष लाठीचार्ज केला म्हणजे लोकशाहीचा अंत आहे.अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय दलित पँथर सेनेच्या प्रदेशाध्यक्ष प्रशांत केदार यांनी तहसीलदार यांना निवेदन देताना व्यक्त केली.दलित पँथर सेनेच्या वतीने तहसीलदार अतुल पाटोळे यांना चक्क डोळ्याला काळीपट्टी बांधून निवेदन देण्यात आले.यावेळी केंद्र सरकारच्या हुकूमशाही कारभाराचा पाढा कार्यकर्त्यांनी वाचला.तहसीलदार अतुल पाटोळे यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की,देशातील सरकार हे लोकशाही संपुष्टात आणून हुकुमशाही प्रस्थापित करू पाहत आहे.हे घातक आहे.देशात शिक्षण व्यवस्थेत भ्रष्टाचार सुरू आहे.पेट्रोल, डिझेल,गॅस यासारख्या जीवनावश्यक वस्तु महाग झाल्या आहेत.त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे मुश्कील झाले आहे.जंतर - मंतरवरील वागचुक व अभिजित दीपक यांचे आंदोलन मोडीत कडून विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीचार्ज केला आहे.हा अन्याय आहे.ब्रिटिश काळाप्रमाणे हुकूमशाही देशात सुरू आहे.देशाच्या प्रत्येक नागरिकांना
लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार असताना त्याच्या अधिकारावर गदा आणण्याचे काम सरकार करीत आहे.सत्तेचा गैरवापर करून पक्ष फोडणे,ई.डी.चा.बेकायदेशीर वापर करणे.मनमानी अध्यादेश जारी करणे.हे लोकशाहीला धरून नाही.लोकशाही धोक्यात आली आहे.त्यामुळे देशात क्रांतीचा उदय होणार आहे.देशातील शिक्षण व्यवस्था व्यवस्थित सभाळू न शकणाऱ्या शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा.तसेच जंतर - मंतर आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील दाखल गुन्हे मागे घ्यावेत.अशी मागणी तहसीलदार यांच्या निवेदनात केली आहे.यावेळी युवती राज्यध्यक्षा प्रमिला गावडे,नितीन जाधव,मातंग सेवा संघाचे तमा दोडमणी,अंकुश केंगार,निकिता केदार,शुभम केंगार,ऋषिकेश गुजले,श्रुष्टी कांबळे, यासह संघटनेचे पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या