सांगली प्रतिनिधी : दिनांक 22 जुलै, 2026 रोजी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली 'शिक्षण संवाद' या एकदिवसीय कार्यशाळेचे महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवन, नेताजी सुभाष पथ, चर्नी रोड, मुंबई येथे ठीक सकाळी 10.00 ते सायं. 05.00 या कालावधीमध्ये आयोजन करण्यात आले आहे.
50 शिक्षण अभ्यासक/शिक्षणतज्ञ, 23 क्रीडा व सैनिकी प्रशिक्षण मार्गदर्शक, 14 तज्ञ योग प्रशिक्षक, 23 प्रबोधनकार यांची राज्यस्तरावर निवड करण्यात आली असून त्यामध्ये तासगाव पंचायत समिती कडील क्रीडा शिक्षक वैभव आंबी, वैभव बंडगर, जिल्हा परिषद शाळा हातनूरचे शिक्षक,क्रीडा मार्गदर्शक, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाचे सांगली जिल्हाध्यक्ष तथा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत पाटील या तिघांची निवड झालेली आहे.
नीता पाटील,संचालक, महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवन, मुंबई व अनिरुध्द कुलकर्णी,अवर सचिव, महाराष्ट्र शासन यांनी कळविलेल्या पत्रानुसार पंकज भोयर,राज्यमंत्री शालेय शिक्षण,रणजीतसिंह देओल,प्रधान सचिव,शालेय शिक्षण विभाग यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
कार्यशाळेसाठी डॉ.नेहा बेलसरे,संदीप वाकचौरे,डॉ.वसंत काळपांडे,डॉ.गीता शिंदे,डॉ. ह. ना. जगताप,डॉ.श्रुती पानसे,दत्तात्रय वारे,बाळासाहेब शेंदुरकर, हे शिक्षण तज्ञ तर वैभव बंडगर,वैभव आंबी,मिलिंद दीक्षीत,शशिकांत पाटील या क्रीडा मार्गदर्शकांची उपस्थिती राहणार आहे.
दत्तात्रय वारे सचिन जोशी,ज्ञानेश्वर महाराज झगरे,पल्लवी आचायव काटेकर, योग प्रशिक्षक पद्मश्री उदय देशपांडे, डॉ. वंदना वाहूळ,उपसुंचालक, योजना, संजय डोर्लीकर,उपसंचालक,एम पी एस पी मार्गदर्शन करणार असून मुख्य मार्गदर्शन शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांचे लाभणार असल्याचे जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील यांनी सांगितले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या