प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : दिल्लीतील विद्यार्थ्यां वरील कथित पोलिस कारवाईच्या निषेधार्थ तासगाव तालुका सुधार समितीच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आले.विद्यार्थ्यांना न्याय मिळावा,दोषींवर कारवाई व्हावी आणि केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारावी, अशा मागण्या आंदोलकांनी केल्या.या पार्श्वभूमीवर आज तासगाव शहर बंदचे आवाहन करण्यात आले होते.मात्र वाढती महागाई, आर्थिक अडचणी आणि दुकानभाड्याचा वाढलेला भार यामुळे व्यापाऱ्यांनी बंदमध्ये सहभागी न होता आपली दुकाने नेहमीप्रमाणे सुरू ठेवली.शहरातील जनजीवन,बाजारपेठ व वाहतूक सुरळीत सुरू राहिली.
दिवसभर शहरातील मुख्य व्यापारी पेठा खुल्या राहिल्याने बंदला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या