प्रतिष्ठा न्यूज
तासगाव, दि. २४ : तासगाव तालुक्यातील तासगाव व येळावी सर्कलच्या १५३७ द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना अंबिया द्राक्ष पीक विमा योजनेअंतर्गत रक्कम रु. १२ कोटी ५६ लाख इतक्या मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई मिळाली आहे, अशी माहिती मा. खासदार संजयकाका पाटील यांनी दिली. तसेच तासगाव तालुक्यातील विसापूर सर्कलमधील ८२४ षेतकऱ्यांची सुमारे रक्कम रु. १४ कोटी ६४ लाख इतकी नुकसान भरपाई रक्कमही जमा होणेसाठी पाठपुरावा सुरु असल्याचेही सांगितले.
यावेळी संजयकाका पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, तासगाव तालुक्यात ऑक्टोबर २०२५ ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीतील झालेल्या अवकाळी पावसाच्या नोंद घेण्यात आलेल्या हवामान केंद्रातील पर्जन्यमानाच्या आकडेवारीमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत झालेचे आढळून आलेले होते. यामुळे अंबिया द्राक्ष पीक विमा योजनेअंतर्गत तासगाव, येळावी आणि विसापूर सर्कलच्या नुकसान भरपाईत मोठा फरक पडून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार होते. या तीन सर्कलमध्ये पावसाच्या नोंदींमध्ये मोठी तफावत निदर्शनास आली होती. त्यानुसार नोंदविण्यात आलेल्या पर्जन्यमानाच्या आकडेवारीनुसार शेतकऱ्यांना सुमारे रु. १५ कोटी पर्यंत रक्कमेची तफावत येत होती. या तांत्रिक त्रुटीमुळे येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी मोठ्या नुकसान भरपाईपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली होती. ही गंभीर चूक माजी खासदार मा. संजयकाका पाटील यांनी तातडीने लक्षात घेवून राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस, राज्याचे कृषिमंत्री मा. दत्तामामा भरणे, राज्याचे कृषी आयुक्त आणि सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिली. संजयकाका पाटील यांच्या यशस्वी पाठपुराव्यामुळे पावसाच्या नोंदीतील तफावत वेळेत दुरुस्त करण्यात आली. व शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळणेचा मार्ग मोकळा झाला आणि ती रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली.
यापूर्वीही मा. खासदार संजयकाका पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे व शेतकरी आंदोलनाचे झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या द्राक्ष पिकाचे नुकसान झालेल्या तासगाव तालुक्यातील १२८२९ शेतकऱ्यांना रु. १९ कोटी ६८ लाख आणि कवठेमहांकाळमधील ५८१९ शेतकऱ्यांना रु. ६ कोटी ३८ लाख इतकी नुकसान भरपाई मिळाली होती. आता या पिक विम्याच्या स्वरुपात नुकसान भरपाई मिळाल्यामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.
*अंबिया द्राक्ष पीक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाईची ठळक वैशिष्ट्ये:*
*तासगाव व येळावी सर्कलमधील एकूण लाभार्थ ॲक्टिव्ह शेतकरी:* १५३७ शेतकरी
*एकूण बाधित क्षेत्र:* ३३४ हेक्टर
*हेक्टरी मिळालेली नुकसान भरपाई:* ३,८०,००० रुपये (प्रति हेक्टर)
*एकूण जमा झालेली रक्कम:* १२ कोटी ५६ लाख रुपये
विसापूर सर्कल मधील रक्कम जमा झाली नाही ती मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याबाबत लवकरच मा. खासदार संजयकाका पाटील राज्याचे कृषिमंत्री मा. दत्तामामा भरणे, राज्याचे कृषी आयुक्त यांची भेट घेणार आहेत.
*विसापूर सर्कलमधील एकूण लाभार्थ ॲक्टिव्ह शेतकरी: ८२४ शेतकरी*
*एकूण बाधित क्षेत्र:* ३८५.३२ हेक्टर
*हेक्टरी मिळालेली नुकसान भरपाई:* १४,६४,२१,६०० रुपये
यापूर्वीही तासगाव कवठेमहांकाळ तालुक्यातील शेतकऱ्यांना अवकाळीचे ६० कोटी रुपये मिळवून देण्यात यश आले
*द्राक्ष पीक नुकसान २०२५-२६/ २०२६-२७ मध्येही बाधित १८६४८ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून २६ कोटी रुपये मिळवून देण्यात यश आले*
निश्चित पणाने शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबतीत यापूर्वीही आवाज उठवला होता,आणि यापुढे ही ज्या ज्या वेळी शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे असे दिसेल, त्या वेळी त्यांची बाजू घेवून शेतकऱ्यांचा आवाज बनून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आग्रही भूमिका असेल .
असे मा खासदार श्री संजयकाका पाटील यांनी बोलताना सांगितले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या