काल परवा शिक्षणमंत्री ना. दादाजी भुसे यांनी आयोजित केलेल्या शिक्षण तज्ञांच्या बैठकीसाठी तासगाव तालुक्यातून शशिकांत पाटील, वैभव आंबी, वैभव बंडगर यांची निवड झाली. सरांचे अभिनंदन करत असताना बैठकीतील अनेक मुद्यांवर सखोल चर्चा झाली. इयत्ता तिसरीतील जुने पुस्तक थोरांची ओळख या पुस्तकाची आवश्यकता तज्ञ मंंडळीनी पटवून दिली. सैनिकी शिक्षण, मतदारयादीचे काम, क्रीडा स्पर्धा असे अनेक मुद्दे तासगावच्या शशिकांत पाटील यांनी सुचविले हे काम लक्षवेधक वाटते.
सध्या आषाढी वारी, बेंदूर सण, श्रावण सोमवार शाळा. हे मुद्दे शिक्षकांत चर्चेत आहेत. यावर बोलताना शशिकांत पाटील म्हणाले, आषाढ एकादशी शनिवारी आली आहे. या दिवशी सकाळी शाळा असते. यानिमित्त अनेक शाळेत सकाळी दिंडी सोहळा घेता येईल. या ऐवजी ही सुट्टी बेंदूर सणाला घेतली तर, यानिमित्तानं मुलांना शेतीचे, पशूधनाचे महत्व समजेल. तर बेंदूर सणाच्या आनंदात ग्रामिण भागातील मुलांना उत्साहाने सहभागी होता येईल. फार वर्षापूर्वी सांगली जिल्हयात श्रावण सोमवारी आवर्जुन सकाळ शाळा घेतली जात होती. अलिकडच्या काळात ही प्रथा बंद झाली. पण सुट्टीयादीच्या बैठकीच्या निमित्त उपस्थित असलेले शशिकांत पाटील यांनी श्रावण सोमवार शाळेचा विषय उपस्थित केला. ही मागणी मान्य झाल्याने जिल्हाभरातील शिवभक्तांनी आनंद व्यक्त केला. यानिमित्ताने लोकांना, शिवमंदीर, महादेव मंदिर, निसर्गरम्य डोंगररांगा, पूरातन मंदिरे येथे भेटी देता येतील.
एक चांगली दिशा घेऊन शशिकांत पाटील शिक्षण क्षेत्रात काम करत आहेत. पुणे मुंबई पर्यंत पोहचत आहेत. त्यांची ही भरारी कौतुकास्पद आहे. योग्य, आणि विशिष्ट चाकोरीतील वाटचालीबद्दल त्यांचे अभिनंदन. जिल्हयाला नवे उमदे अभ्यासू नेतृत्त्व मिळाले याचा आनंद वाटला. शशिकांत पाटील यांना शुभेच्छा !
-सुरेश खारकांडे, पलूस
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या