प्रतिष्ठा न्यूज/योगेश रोकडे
मिरज : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने शेतकरी बांधवांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने 'देवाभाऊ कृषी माऊली सोहळा' आयोजित करण्यात आला आहे. भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा तथा आमदार मा. सौ. चित्राताई वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या सोहळ्यात शेतकरी महिला भगिनींचा सन्मान करून त्यांच्या कष्टाला अभिवादन करण्यात येणार आहे. तसेच महिला सक्षमीकरण, कृषी क्षेत्रातील योगदान आणि समाजहिताच्या विविध विषयांवर मार्गदर्शन व संवादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमाचा कार्यक्रम शनिवार, दि. २५ जुलै २०२६ रोजी दुपारी २ वाजता विद्यादीप इंग्लिश मीडियम स्कूल, बेळंकी येथे आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाचे नियोजन भाजपा महिला मोर्चा सांगली शहर अभियानप्रमुख सौ. मंजिरीताई गाडगीळ तसेच भाजपा महिला मोर्चा सांगली शहर जिल्हाध्यक्षा सौ. स्वातीताई सुशांत खाडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आहे.
'देवाभाऊ कृषी माऊली सोहळ्या'ला शेतकरी महिला भगिनी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या