मुंबई प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाचे सांगली जिल्हाध्यक्ष तथा अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र शशिकांत पाटील यांनी शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांचे कडे केलेल्या शैक्षणिक मागण्यांपैकी बहुतांश मागण्या शिक्षण मंत्री यांनी मान्य केल्या आहेत.
जिल्हा परिषद विद्यार्थ्यांची जिल्हास्तरानंतर विभागीय व राज्यस्तरावर क्रीडा स्पर्धा घेण्याबाबत परिषदेने केलेली मागणी शिक्षण मंत्र्यांनी मान्य केली असून यावर्षी पासून त्याची अंमलबजावणी होणार आहे.
इयत्ता तिसरी मध्ये जुन्या 'थोरांची ओळख' या पुस्तकामध्ये महाराष्ट्रातील थोर व्यक्तींचा समावेश होऊन ते पुस्तक पुन्हा एकदा अभ्यासक्रमात लावण्याची महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची मागणी शिक्षणमंत्री यांनी मान्य केली आहे.
सैनिकी शिक्षण राष्ट्रप्रेम व राष्ट्रीयत्वाची भावना शिक्षकांच्या मधून पहिलीपासून वाढीस लागण्यासाठी इयत्ता पहिलीपासून सैनिकी शिक्षणाचे अंमलबजावणी करण्याची मागणीही महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने केलेली होती.याही निर्णयाची घोषणा शिक्षण मंत्री यांनी 'शिक्षक संवाद' कार्यशाळेत केली
राज्यभरामध्ये 25000 पेक्षा जास्त शिक्षक पदे रिक्त असून त्यांची भरती करण्याची ही मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने केली होती, त्याही 25000 शिक्षकांची भरती नजीकच्या काळात प्राधान्याने करण्याची घोषणा शिक्षण मंत्री यांनी केली.
नवीन शैक्षणिक वर्षांमध्ये शाळा प्रवेशाच्या दिवशी 40000 शाळांमधील शाळा प्रवेश मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री अधिकारी पदाधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाल्याचे व दोन कोटी विद्यार्थ्यांची देशभक्तीपर गीतांवर समूह कवायतींचा विश्वविक्रम सर्व घटकांच्या योगदानातून झाल्याचे यावेळी शिक्षण मंत्र्यांनी सांगितले.
मनोगतनंतर पूर्ण वेळ शिक्षण संवाद कार्यशाळेत प्रेक्षकांच्या मध्ये उपस्थित राहिलेले शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी 'पूर्व जन्माची पुण्याई म्हणून शिक्षण विभागात कामाची संधी मिळाल्याचे' भावनिक मनोगत यावेळी व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या मागणीप्रमाणे BLO व एस आय आर सारख्या सर्व अशैक्षणिक कामांतून शिक्षकांची टप्प्याटप्प्याने मुक्तता करणार असल्याचेही शिक्षण मंत्र्यांनी सांगितले.
महाराष्ट्र जवाहर बाल भवन सभागृह चर्नी रोड मुंबई येथे संपन्न झालेल्या शिक्षण संवाद कार्यशाळेत शिक्षण मंत्री दादाजी भुसे, शिक्षण आयुक्त सच्छिंद्रप्रताप सिंह, बालभारती संचालक अनुराधा ओक,एस सी ई आर टी संचालक हेमंत वसेकर,यांच्याशी शिक्षक परिषदेच्या राष्ट्रहित शिक्षणहित विद्यार्थीहित शिक्षकहित या चतुसूत्री आधारे राष्ट्रीय चारित्र निर्माण,योग, संस्कार,शिक्षण,अभ्यासक्रम, व्यावसायिक कौशल्ये विकसन,शिक्षकांच्या अडचणी यावर विस्तृत चर्चा झाल्याचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत पाटील यांनी सांगितले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या