प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:रसायनशास्त्रातील ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. गजानन राशिनकर यांचा जागतिक पातळीवरील अत्युच्च ५ टक्के वैज्ञानिकांच्या यादीत समावेश झाल्याबद्दल आडी येथील संजीवनीगिरीवरील श्री दत्त देवस्थान मठात परमपूज्य परमात्मराज महाराज यांच्या हस्ते शाल,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.डॉ.राशिनकर यांनी सहकुटुंब भगवान दत्तात्रेय व परमपूज्य परमात्मराज महाराजांचे दर्शन घेऊन पुढील संशोधन कार्यासाठी आशीर्वाद घेतला.यावेळी परमात्मराज महाराज यांनी डॉ.राशिनकर यांच्या जागतिक वैज्ञानिक क्षेत्रातील योगदानाचे कौतुक करत, कॅन्सरविरोधी संशोधनातील त्यांच्या महत्त्वपूर्ण कार्याचा विशेष उल्लेख केला.गुरुवारच्या भक्तिमय वातावरणात हजारो भाविकांच्या उपस्थितीत हा गौरव सोहळा पार पडला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या