तासगाव प्रतिनिधी : स्वामी रामानंद भारती विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज, तासगाव येथील 1996 ते 1998 या बॅचच्या यशस्वी माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त करत विद्यार्थ्यांना शंभर आंब्याची रोपे भेट दिली. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम उत्साहात पार पडला.
या उपक्रमासाठी माजी विद्यार्थी श्री. सचिन पाटील (IDSH Global Pvt. Ltd. Engineering Service), श्री. विनोद माधवराव पवार (व्यवसायिक) आणि श्री. अनमोल चव्हाण (एन. के. मोटार ड्रायव्हिंग स्कूल, तासगाव) यांनी पुढाकार घेतला.
यावेळी विद्यालयाच्या वतीने उपमुख्याध्यापिका सौ. भोसले मॅडम व पर्यवेक्षक श्री. पाटोळे सर यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच विद्यालयाचे प्रभारी प्राचार्य श्री. एस. जे. पाटील सर व पर्यवेक्षक श्री. कृष्णाकर सर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाला विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. माजी विद्यार्थ्यांनी शाळेशी असलेले आपले ऋण व्यक्त करत भविष्यातही अशा सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांसाठी सहकार्य करण्याची भावना व्यक्त केली.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वृक्षसंवर्धनाची जाणीव निर्माण होण्यास मदत होणार असून, शाळेच्या परिसरात पर्यावरणपूरक वातावरण निर्माण करण्यासाठी हा उपक्रम प्रेरणादायी ठरला. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व मान्यवरांचे आभार मानण्यात आले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या