प्रतिष्ठा न्यूज / अनिल शिंदे
सावळज : सावळज ता. तासगाव येथील तीर्थक्षेत्र श्री रामलिंग मंदिराचा ब वर्ग प्रस्तावासाठी प्रयत्न करू असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष ॲड स्वप्निल पाटील यांनी रामलिंग मंदिराच्या अन्नछत्र उभारणी कार्यक्रमाचे भूमिपूजन समारंभ प्रसंगी केले.
पाटील म्हणाले की, सावळज येथे पवित्र तीर्थक्षेत्र रामलिंग मंदिर जागृत देवस्थान आहे. या ठिकाणी महाराष्ट्र व कर्नाटकातून दर्शन घेण्यासाठी भाविक भक्तगण येतात. सांगलीचे पालकमंत्री ना.चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगली जिल्हा नियोजन विकास समिती मधून क वर्ग तीर्थक्षेत्रासाठी येथील मंदिर समितीच्या मागणीनुसार अन्नछत्र उभारणी कामासाठी रुपये दहा लाखाचा निधी दिला आहे. या अन्नछत्र उभारणीमुळे या ठिकाणी सावळज व भागातील वाढदिवस, डोहाळेजेवण, लग्न, पारायण सोहळा या कार्यक्रमाला याचा उपयोग होणार आहे. ग्रामस्थांच्या व भाविकांच्या मागणीनुसार रामलिंग मंदिराच्या ब वर्ग मध्ये समावेश होण्यासाठी पालकमंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांचेकडे पाठपुरावा केला जाईल. रामलिंग मंदिरासाठी आणखी निधी उपलब्ध करून देण्यात येईल.
यावेळी भाजपा सरचिटणीस प्रशांत कुलकर्णी, मागे सरपंच दत्ता केडगे, विश्वास निकम,दिलीप देसाई, सुभाष माळी, पोपट हंकारे,सचिन देसाई, नंदू देसाई,सरपंच संदीप पाटील, उपसरपंच रमेश कांबळे, संचालक बाळासाहेब थोरात, विलास तोडकर, विजय पाटील,बाळासो निकम,प्रदीप माळी, राजू वांडरे, एम एन दादा चिवटे, बापूसो मस्के, मनोज पाटील, सुनील भोसले,सर्व देसाई बंधू व मोठ्या संख्येने ग्रामस्थ,भाविक भजनी मंडळ उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या