प्रतिष्ठा न्यूज
हातनूर प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे सांगली जिल्हाध्यक्ष तथा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत पाटील यांच्या संकल्पनेतून, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शाळा व्यवस्थापनचे माजी अध्यक्ष हातनूरचे सचिन पाटील व मांजर्डेचे युवानेते प्रकाश मोहिते यांच्या माध्यमातून मोहननाना पाटील यांचे कडून 25 पात्र मुलांना चष्मे वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांनी "दृष्टी विकासाची-वेध भविष्याचा" अशाप्रकारे आमदार रोहितदादांच्या मार्गदर्शनाखाली मोहननाना पाटील यांचे 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण याप्रकारे अनेक उपक्रम सुरू असतात व सध्याच्या मतदारांना प्रलोभन दावण्याच्या प्रघात असणाऱ्या काळात मोहननानांनी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी येणारे अडथळे दूर करून आदर्श निर्माण केला असल्याचे सांगितले.
परिषदेचे जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील यांनी यापूर्वी शिक्षक परिषदेचा सांगली शाखा वर्धापन दिन व राज्याध्यक्ष राजेशजी सुर्वे यांचा वाढदिवसाचे औचित्य साधून 19 डिसेंबरला कुल्लोळी नेत्रालयाच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळा हातनुरचे सर्व 325 विद्यार्थी, उज्वल विद्यामंदिर चे 125 विद्यार्थी व 175 नागरिक असे व स्टाफ मिळून एकूण 650 लोकांचे पाच लाख रुपये किमतीच्या अद्यावत संगणकीकृत मशीनवर डोळे तपासण्यात आले होते, विद्यार्थ्यांसह सर्वांनीच मोबाईलचा स्क्रीन टाईम कमीत कमी वापरावयास हवा असे सांगितले.
डॉक्टर अमोल सोनटक्के यांच्या व कुल्लोळी हॉस्पिटल यांच्या माध्यमातून संपतराव बेंद्रीकर यांच्या पुढाकाराने सात रुग्णांच्या डोळ्यांच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. सर्व विद्यार्थ्यांचे आहाराबाबत प्रबोधन करण्यात आले.
डोळे तपासणी शिबिराच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक वसंतराव पाटील,कलावती कदम,जोत्स्ना पाटील,शशिकांत पाटील,नीता सावंत,सलीम मुलाणी, यास्मिन वलांडकर,सलमा मुल्ला, दीपक बोबडे,शशिकला पाटील, स्वाती पाटील,पल्लवी भोसले,अथर्व बेंद्रीकर यांनी प्रयत्न केले.
475 विद्यार्थ्यांपैकी 50 विद्यार्थ्यांना डोळ्यांचा त्रास आढळून आला. यापैकी 25 विद्यार्थ्यांना चष्मे आवश्यक असल्यामुळे माननीय मोहननाना पाटील यांना शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष सचिन पाटील यांच्या माध्यमातून आवाहन करण्यात आले.आवाहनाला प्रतिसाद देत माननीय मोहननाना पाटील यांनी विद्यार्थ्यांना अतिशय चांगल्या गुणवत्तेचे,अच्युत्कृष्ट फ्रेम असलेले, दैनंदिन वापरयोग्य चष्मे वाटप करण्यात आले.
चष्मे वाटपप्रसंगी सरपंच जयश्री माने,तालुकाध्यक्ष सचिन पाटील,शाळा व्यवस्थापन अध्यक्ष जगदीश पाटील,सदस्य विनायक पाटील,नामदेव माने,महादेव पाटील,राकेश पाटील,दादासो पाटील,मयूर चव्हाण,सुधीर किल्लेदार,रामदास पाटील,प्रकाश खुजट,हायस्कूलचे मुख्याध्यापक जीवन कांबळे,शिक्षक आर.आर. पाटील, सुजित पाटील उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या