प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:येथील लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित,सोलापूर शाखा तासगाव यांच्या वतीने पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमास तासगाव तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.यावेळी संकेत पाटील,प्रमोद चव्हाण,अजित माने,किरण देवकुळे,किरण कुंभार
या पत्रकारांचा संस्थेच्या वतीने शाखेचे सल्लागार एम.डी.पाटील सर व अभिजीत गेंड यांच्या हस्ते भेटवस्तू,बँकेचा अहवाल व कॅलेंडर देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी शाखेचे सल्लागार,खातेदार तसेच शाखाधिकारी सौ.शुभांगी तोडकर,क्लार्क सौ.गायत्री सूर्यवंशी,आदित्य जाधव,अक्षय यांच्यासह शाखेतील कर्मचारी वर्ग उपस्थित होता.यावेळी बोलताना सल्लागार पाटील यांनी पत्रकार समाजाच्या माध्यमातून समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडून न्याय देण्याचे कामं करतो.लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची भूमिका पार पाडणाऱ्या पत्रकारांचे कार्य प्रेरणादायी असून त्यांचा सन्मान करणे ही संस्थेची सामाजिक बांधिलकी असल्याचे त्यांनी सांगितले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या