प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : शहरातील क्षत्रिय माळी समाज संघटना,सावित्रीच्या लेखी महिला संघटना व श्री संत सावता माळी सेवा प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती गोटेवाडी रोड येथील मंगल कार्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून तासगावच्या नगराध्यक्षा सौ.विजया पाटील होत्या. यावेळी अंडर 19 महिला क्रिकेट संघाची महाराष्ट्राची कॅप्टन व तासगावची कन्या सह्याद्री कदम हिने देशपातळीवर कामगिरी करत संघाला विजयी केल्या बद्दल तिचा विशेष सत्कार कारण्यात आला.यावेळी तासगाव नगर परिषदेच्या निवडणुकीत 12 प्रभागातून निवडून आलेल्या सर्व महिला नगरसेविकेंचा सत्कार करण्यात आला.यावेळी आयुषी माळी,प्राप्ती माळी,रिया माळी,रिद्धी बनसवडे,प्राजक्ता माळी, स्वरा माळी,समृद्धी माळी,आरोही माळी,स्वानंदी माळी,सई कोल्हे या मुलींची आणि सह्याद्री कदम व नगराध्यक्षा विजया पाटील यांची मनोगते झाली.जेष्ठ कवयत्री विमल ताई कांबळे यांनी काव्यगायन व ओवी सादर केली.स्वागत प्राजक्ता कोल्हे,सूत्रसंचालन शीतल माळी, प्रास्ताविक मानसी माळी,पाहुण्यांचा परिचय रचना माळी यांनी केला तर आभार तृप्ती माळी यांनी मानले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या