प्रतिष्ठा न्यूज / योगेश रोकडे
सांगली: चिंतामणराव व्यापार महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व अर्थशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 'गड किल्ल्यांचे सामाजिक व आर्थिक महत्त्व' या विषयावर डॉ. सारंग घारपुरे यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी डॉ. घारपुरे, विलिन्डन, महाविद्यालय सांगली यांनी दाखले देऊन गड किल्ल्यांचे सामाजिक व आर्थिक योगदान विशद केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश कुंभार होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. महेंद्र बागुल राष्ट्रीय सेवा योजना व अर्थशास्त्र विभाग प्रमुख यांनी केले. प्रमुख पाहुण्यांची ओळख एन एस एस स्वयंसेविका कु. कार्तिकी ढवळे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार कु. पूजादेवी यादव या एन एस एस स्वयंसेविका यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. निवृत्ती कोटकर यांनी केले. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती प्रा. एन. के. आपटे आजीव सदस्य डीइएस पुणे, डॉ. शार्दुल ठाकूर, डॉ. किशोर भोसले, डॉ. आशिष पुराणिक आजीव सदस्य डीइएस, पुणे, प्रा. अनिल खर्चे, डॉ. जे. येस. बेडेकर, प्रा. स्वाती गुळवणे, डॉ. स्वाती पाटील, प्रा. सोनाली चव्हाण, प्रा. सुप्रिया सूर्यवंशी, प्रा. स्नेहा छत्रे, प्रा. मनीषा मोहनानी, प्रा. पवन मनुरकर, डॉ. गणेश सिंहासने इत्यादी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या