प्रतिष्ठा न्यूज
जत प्रतिनिधी : उमराणी (ता.जत) गावातील नैसर्गिक ओढा पात्रात अवैध मार्गाने टाकलेल्या मुरूम काढावा.ओढपात्र खुले करावे.या मागणीसाठी प्रांताधिकारी (प्रशासकीय भवन जत) कार्यालयासमोर राष्ट्रीय दलित पँथर सेनेच्या सुरू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाकडे तहसीलदार यांनी दुर्लक्ष आहे.तेंव्हा दलित पँथर सेनेचे राज्याध्यक्ष प्रशांत केदार यांनी जत तहसीलदार प्रवीण धानोरकर व तहसिल प्रशासनाचे प्रतिकात्मक श्राद्ध आंदोलन घालून निषेध केला..यावेळी जत तालुका अध्यक्ष नवनाथ पवार,अविनाश पाथरवट,सिध्दाप्पा खांडेकर,अतुल ऐवळे,निलेश मांगलेकर,बसगोंडा तेली,शहाजी वाघमोडे,आदि उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या