प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:चीन व अफगाणिस्तान येथुन आयात केलेला बेदाणा वॉशिंग करून कलर देऊन तासगाव मार्केट कमिटीच्या सौद्यात विक्री केलेल्या कोल्ड स्टोरेज मालक व विक्री केलेल्या व्यापाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी यासह अन्य मागण्यांसाठी काल मोर्चा झाला.या मोर्चा समोर बोलताना निमणीचे माजी उपसरपंच आर.डी.पाटील म्हणाले तासगावच्या मार्केट कमिटीला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार त्यांनी संबंधित व्यापाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा मी स्वतः काही द्राक्ष व बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांसह तासगाव पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता (BNS) मधील कलम ३१८,३३६,३४९ व ३५०, वस्तूंचे भौगोलिक मानांकन (नोंदणी आणि संरक्षण) कायदा १९९९ मधील तरतुदीनुसार तसेच व्यापार चिन्ह कायद्यातील कलम १०३,१०४,१०५, त्याचबरोबर ग्राहक संरक्षण कायदा,अन्न व औषध भेसळ प्रतिबंधक कायदा,फेमा अशा सर्व कायद्यांतील तरतुदीनुसार संबंधित व्यापाऱ्यांवर कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी कायदेविषयक सल्ला घेऊन गुन्हा दाखल करणार आहे. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या