प्रतिष्ठा न्यूज
कोल्हापूर प्रतिनिधी : शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या वतीने आयोजित विभागीय पुरुष हँडबॉल स्पर्धेत दसरा चौक येथील श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत अंतिम सामन्यात अण्णासाहेब डांगे महाविद्यालयाचा पराभव करून प्रथम क्रमांक पटकावला.
याशिवाय वाघोली (जि. सातारा) येथे पार पडलेल्या शिवाजी विद्यापीठ आंतरविभागीय हँडबॉल स्पर्धेतही शहाजी महाविद्यालयाने तृतीय क्रमांक मिळवून महाविद्यालयाच्या क्रीडा परंपरेला उजाळा दिला.
या स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल हर्षल वाळके, सुमित बच्चे आणि पारस खिचडे यांची जयपूर (राजस्थान) येथे होणाऱ्या वेस्ट झोन आंतरविद्यापीठ हँडबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तसेच संघाचा कर्णधार ओम दुर्गुळे याची दिल्ली येथे होणाऱ्या ४७ व्या राष्ट्रीय हँडबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघातून निवड झाली आहे.
या यशस्वी कामगिरीसाठी खेळाडूंना श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे व्हॉईस चीफ पेट्रन व चेअरमन मा. मानसिंग बोंद्रे दादा, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण तसेच जिमखाना प्रमुख डॉ. प्रशांत पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. महाविद्यालयातील सर्व स्तरातून खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या