प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:तालुक्यातील बलगवडे येथील कब्रस्तान परिसरात लिंबांवर विविध व्यक्तींची नावे लिहून त्यामध्ये सुई टोचल्याचा संशयास्पद प्रकार समोर आला आहे.परिसरात तब्बल २० ते ३० लिंबांवर नावे लिहिलेली आढळून आल्याने नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. कब्रस्तान सारख्या पवित्र व संवेदनशील ठिकाणी हा प्रकार नेमका कोणी आणि कोणत्या उद्देशाने केला, याबाबत नागरिकांमध्ये विविध चर्चा सुरू आहेत.या घटनेमुळे परिसरात भीती व संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान,या प्रकारामागे नेमके कारण काय आहे,याबाबत कोणताही ठोस पुरावा समोर आलेला नसून नागरिकांनी अफवा व अंधश्रद्धेला बळी न पडता प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन सखोल चौकशी करावी,अशी मागणी केली आहे.कब्रस्तान परिसराची पवित्रता अबाधित ठेवण्याबरोबरच सामाजिक सलोखा कायम राहण्यासाठी संबंधित प्रशासनाने तातडीने पाहणी करून दोषींवर योग्य ती कारवाई करावी,अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या