प्रतिष्ठा न्यूज
तासगाव : कुपवाड येथील केसरेकर दाम्पत्याच्या हत्याकांडातील आरोपीस लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळावा, या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या वतीने शनिवार, दि. २२ ऑगस्ट रोजी तासगाव बंदची हाक देण्यात आली आहे.याबाबतचे निवेदन तासगाव पोलीस प्रशासनास देण्यात आले.दि. १५ ऑगस्ट रोजी कुपवाड येथे घडलेल्या केसरेकर दाम्पत्याच्या हत्याकांडामुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेतील आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करून न्यायालयीन प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करावी आणि आरोपीस फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे.पीडित कुटुंबाला न्याय मिळावा तसेच अशा गंभीर घटनांना आळा बसावा, यासाठी तासगाव शहरातील नागरिकांनी बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे. या बंदची माहिती पोलीस प्रशासनाला देत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.दरम्यान,या हत्याकांडातील आरोपीवर कठोर कारवाई होईपर्यंत पाठपुरावा सुरू ठेवण्याचा निर्धार शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या