तासगाव : ढवळी फाटा ते ढवळी बसस्थानक रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून, ठिकठिकाणी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालक, विद्यार्थी, शेतकरी व नागरिक त्रस्त झाले आहेत. पावसामुळे खड्ड्यांत पाणी साचत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.
रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून खड्डे बुजवावेत, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. आठ दिवसांत रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास ढवळी फाटा येथे रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेने दिला आहे.यावेळी मनसेचे सांगली जिल्हा संघटक अमोल काळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने कार्यवाही करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या