प्रतिष्ठा न्यूज
सांगली : विश्रामबाग येथील लोकशिक्षण मंडळ संचलित देशभक्त नाथाजी लाड विद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये स्वयं-रोजगाराचा दृष्टिकोन वाढावा या उद्देशाने संवाद शिबीराचे आयोजन करण्यात आले.
या शिबीराच्या संवादक म्हणून अनन्या ब्युटीपार्लरच्या संचालिका अनुराधा शिंदे उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात स्वागतगीताने झाली. यावेळी शिक्षिका ए. पी. लाड यांच्या हस्ते अनुराधा शिंदे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
शिक्षिका रोहिणी कुलकर्णी यांनी शिंदे यांचा परिचय करून दिला. त्यानंतर इ. दहावीची विद्यार्थिनी पोर्णिमा मनोज माने हिने शिंदे यांची रंजक मुलाखत घेतली. ब्युटीपार्लर या क्षेत्रातील संधी, प्रशिक्षण, भांडवल आणि व्यवसायातील बारकावे याबद्दल शिंदे यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी विविध शंका उपस्थित केल्या. त्यांचे समाधानकारक निरसनही करण्यात आले.
या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक सचिन लाड, संस्थेचे संचालक बाळासाहेब शेटे, नवशिक्षण मंदिरचे मुख्याध्यापक दत्तात्रय भोसले, संस्थेचे सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहिणी कुलकर्णी यांनी तर आभार शुभदा पवार यांनी मानले. 'वंदे मातरम्' या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या