सांगली प्रतिनिधी : संगीताचार्य काणेबुवा फाउंडेशन संचालित गुरुकुल संगीत विद्यालयाच्यावतीने गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून 'स्वरयज्ञ' या अखंड संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी (ता. १५) आणि रविवारी (ता.१६) सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत दिवसभर सलग कार्यक्रम असेल. तो सर्वांसाठी खुला आहे.
गुरुकुलच्या पुणे सांगली आणि भिलवडी येथील विद्याथ्यांचे गायन होणार आहे. तो कार्यक्रम सर्वांना ऑनलाईनही पाहता येईल, अतिथी कलाकार आशय कुलकणी (तबला) आणि श्रीराम हसबनीस (हार्मोनिअम) यांचे विशेष सादरीकरण होणार आहे. संस्थेच्या येथील मारुती चौकातील काकासाहेब चितळे सभागृहात (गणेश मंगल कार्यालयावरील मजल्यावर) दोन्ही दिवस कार्यक्रम सर्वांना पाहता येतील. कार्यक्रमाचे उद्घाटन चितळे उद्योग समूहाचे संचालक मकरंद चितळे यांच्या हस्ते सकाळी नऊ वाजता होणार आहे. तरी या कार्यक्रमाचा सर्व संगीत प्रेमींनी लाभ घ्यावा, असे आवाहन विदुषी मंजुषा पाटील यांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या