सावळज दि. 13 : राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत थकीत शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांची कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला मात्र नियमित व प्रामाणिकपणे कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मात्र 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे या निर्णयानंतर नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष व नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक वर्षे आर्थिक संकटे, नैसर्गिक आपत्ती, वाढता उत्पादन खर्च आणि शेतीमालाच्या अस्थिर बाजारभावाचा सामना करतही पोटाला चिमटा घेऊन,खाजगी सावकार,किंवा पै पाहुण्यांकडून उसने पैसे घेऊन या शेतकऱ्यांनी वेळेवर कर्जफेड केली आहे मात्र शासनाने या नियमित शेतकऱ्यांना शासनाकडून अपेक्षित न्याय मिळत नसल्याची भावना व्यक्त होत आहे.
तरी नियमित कर्जदारांचे म्हणणे आहे की,प्रत्येक कर्जमाफीच्या वेळी थकबाकी दारांनाच मोठा लाभ मिळत असल्याने प्रामाणिक कर्जदार शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी संतप्त असून शासनाच्या धोरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
तरी थकीत कर्जदार शेतकऱ्यांप्रमाणे कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दोन लाख प्रोत्साहनपर अनुदान मिळावे.
या संदर्भात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने व कर्जमाफी पासून वंचित राहिलेले शेतकरी यांनी तासगाव - कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार रोहित आर आर आबा पाटील यांना निवेदन देऊन सविस्तरपणे चर्चा केली यावेळी या वेळी आमदार रोहित पाटील यांनी वरिष्ठ पातळीवर सकारात्मक चर्चा करून वंचित शेतकऱ्यांना न्याय दिला जाईल असे आश्वासन आमदार श्री पाटील यांनी दिले.
यावेळी शिवसेनेचे मा. तालुका प्रमुख अनिल (भाऊ) शिंदे,पै.गजानन पाटील, दयानंद कांबळे, सुनील मगदूम,श्रीकांत शिंदे,अनिल पाटील, भूपाल देसाई, सचिन घोरपडे अविनाश सावळे, धोंडीराम चव्हाण व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या