सांगली प्रतिनिधी : कृष्णा नदीत सुरक्षित पोहता यावे, फिरायला येणाऱ्यांना सुरक्षित व स्वच्छ वातावरण मिळावे, यासाठी तातडीने उपाययोजना राबवल्या जातील, असा निर्णय समर्थ घाटावर आयोजित बैठकीत घेण्यात आला. कृष्णामाई जलतरण संस्थेच्या मागणीनुसार भाजप नेते पृथ्वीराज पाटील यांच्या पुढाकारने महापालिका, पाटबंधारे व वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक झाली.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांचे विशेष कार्य अधिकारी संतोष साखरे या बैठकीला प्रमुख पाहुणे होते. महापालिका, वन विभाग, पाटबंधारे विभागाचे अधिकाऱ्यांनी त्यांच्या विभागाशी संबंधित विषयांत तातडीने लक्ष घालावे, अशी आग्रही भूमिका या बैठकीत मांडण्यात आली. कृष्णामाई जलतरण संस्थेतर्फे श्रीगोपाल मर्दा, आनंद जोशी, भास्कर कुलकर्णी, डॉ. चव्हाण यांनी दुखणी मांडली. गेल्या ७ वर्षांपासून या घाटावर मगरीचा वावर सुरु आहे. वारंवार मगर हल्ले करत आहे. मगरींचे स्थलांतर करावे. शेरी नाल्याचे अत्यंत प्रदुषित पाणी कृष्णा नदीपात्रात मिसळत आहे. ते तातडीने थांबवावे. सरकारी घाट, माई घाट व सांगलीवाडी घाट यांचे बांधकाम खराव झाले आहे. त्याची दुरुस्ती व्हावी. जुना आयर्विन पुलावर झुडपे उगवली आहेत. ती पूर्णपणे काढून टाकणेत यावीत. माई घाटाजवळ नागरीकांना बसण्यासाठी बांधलेल्या पायऱ्यांवरील फरशा निघाल्या आहेत. त्यावर नवीन फरशा बसवाव्यात, अशा मागण्या त्यांनी केल्या.
काहीजण नदीपात्रात आणि नाल्यामध्ये मेलेल्या कोंबड्या आणि चिकनचे वेस्ट टाकत आहेत त्याबाबत महापालिका आयुक्तांना भेटून कारवाईची मागणी करण्याचा निर्णय झाला.
श्री. साखरे म्हणाले, ‘‘कृष्णा नदी हे सांगलीचे बलस्थान आहे. त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने कराव्यात. त्यासाठी आवश्यक निधी मंजुरीला राज्य शानसाकडे आम्ही मिळून पाठपुरावा करू.’’ पृथ्वीराज पाटील म्हणाले, ‘‘कृष्णा नदीकाठावरील छोट्या समस्या तातडीने सोडवण्यासाठी सर्व विभागांनी तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा आहे. वन विभागाने या ठिकाणी एक खासगी सुरक्षा रक्षक नेमावा. मगरीच्या स्थलांतरासाठी प्रस्ताव करावा. मोठ्या निधीची गरज आहे, तिथे आम्ही मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांच्या माध्यमातून निधी उपलब्धतेसाठी प्रयत्न करू.’’
पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सीमा मोहिते, महापूर अभ्यासक सर्जेराव पाटील, शाखा अभियंता आदित्य मोहिते, वन विभागाचे सर्जेराव सोनवडेकर, श्री. सोनवणे, श्री. भोसले, माजी मानद वन्यजीव रक्षक अजितकुमार पाटील,
जीवन पेंडुरकर, प्रकाश कुंभोजकर, शेखर तोरो, दीपक सदलगे, रवींद्र जोशी, सर्जेराव पाटील , विजय पडियार, आप्पा केंपवडे, अभय कट्टी, सौ.तनुजा सदलगे, सीए नगरकर मॅडमआदी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या