गगनबावडा : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) गगनबावडा आगारासाठी मंजूर झालेल्या अध्यायावत पाच नवीन एसटी बसेसचे लोकार्पण नुकतेच उत्साहात पार पडले. या नव्या बसेसमुळे तालुक्यातील नागरिक, विद्यार्थी, शेतकरी आणि नोकरदारांचा प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ आणि दर्जेदार होणार आहे.
गगनबावडा परिसरातील प्रवाशांची वाढती संख्या आणि प्रवाशांच्या गरजा लक्षात घेऊन राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता. या पाठपुराव्याला यश आले असून पहिल्या टप्प्यात ५ नवीन बसेस आगाराला मिळाल्या आहेत, तर लवकरच आणखी ५ बसेस उपलब्ध होतील, अशी माहिती आमदार चंद्रदीप नरके यांनी याप्रसंगी दिली.
आमदार नरके यांनी पुढे सांगितले की, सुरुवातीला मंजूर झालेल्या १० बसेसपैकी ५ बसेस दाखल झाल्या असून, इतर बसेस मिळून आगारात आता एकूण १५ नवीन बसेस प्रवाशांच्या सेवेत उपलब्ध झाल्या आहेत. ग्रामीण भागासाठी एसटी ही जीवनवाहिनी आहे. त्यामुळे विद्यार्थी, नरसोबावाडी बाळूमामा यासाठी देवदर्शनासाठी जाणारे भाविक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या आवश्यकतेनुसार बस फेऱ्यांचे योग्य नियोजन करण्याचे स्पष्ट आदेश एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. सर्वसामान्यांना चांगल्या वाहतूक सुविधा मिळवून देण्यासाठी पुढेही प्रयत्नशील राहू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या लोकार्पण सोहळ्याला कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष पी. जी. शिंदे, तहसीलदार रूपाली सूर्यवंशी, माजी सभापती एकनाथ शिंदे, माजी सरपंच अरुण चव्हाण, माजी पंचायत समिती सदस्य आनंदा पाटील, सुनील पडवळ, बाबुराव पडवळ, डेपो व्यवस्थापक शिंगाडे, एसटी महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
"आता ४० आसनी, बीएस-६ इंजिन, पुशबॅक आसन, मोबाईल चार्जिंग व न्यूमॅटिक दरवाजासारख्या सुविधांनी सज्ज अशा पाच नव्या बसेस प्रवास अधिक सुरक्षित व आरामदायक करणार "
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या