प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या शालेय आंतरवासिता उपक्रमास आरवडे, चिंचणी, मनेराजुरी, खंडोबाचीवाडी, कवठेएकंद व पलूस येथील विद्यालयांमध्ये प्रारंभ झाला. महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. रत्नाकर म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.
उपक्रमांतर्गत विद्यालयांमध्ये डिजिटल बॅनरचे अनावरण, १०० हून अधिक सीड बॉलचे वितरण तसेच सीड बँकेचे उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांना विविध बियांचे संकलन करण्याचे आवाहन करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादनही करण्यात आले.
श्री सिद्धनाथ हायस्कूल, आरवडे येथे मुख्याध्यापक एम. बी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शक प्रा. प्रमोद शेंडगे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. नियोजन अभिरूप मुख्याध्यापिका शीतल पाटील यांनी केले.ल. की. हायस्कूल, पलूस येथे प्राचार्य ए. एस. सावंत यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शक प्रा. अंकुश पंडित यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. नियोजन अश्विनी वरुडे यांनी केले.पद्मभूषण वसंतराव दादा पाटील विद्यालय, खंडोबाचीवाडी येथे मुख्याध्यापक मंडले सर यांच्या अध्यक्षतेखाली व प्रा. प्रमोद शेंडगे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. नियोजन रुचिता घोडके यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या