प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : येथील सुप्रसिद्ध लाईफकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या मॅनेजिंग डायरेक्टर (MD) पदी डॉ. ज्ञानेश्वर शिवणकर यांची एकमताने निवड करण्यात आली. नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हॉस्पिटलचे कुटुंबप्रमुख डॉ.विनय पतकी यांनी ही घोषणा केली.या बैठकीस संचालक डॉ. धनाजी जगताप, डॉ. सचिन वाघ, डॉ. विजय माने, डॉ. सुहास कदम, डॉ. मिलिंद जाधव, डॉ. जहीर नदाफ, प्रताप घाडगे यांच्यासह संचालक मंडळाचे सदस्य उपस्थित होते.बैठकीत हॉस्पिटलच्या विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला.तसेच आगामी काळातील हॉस्पिटलचा विस्तार, नवीन आरोग्य सुविधा आणि रुग्णांना अधिक दर्जेदार सेवा उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा करण्यात आली.नवनियुक्त मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. ज्ञानेश्वर शिवणकर म्हणाले, “तासगाव व परिसरातील नागरिकांनी अल्पावधीतच लाईफकेअर हॉस्पिटलला आपले हक्काचे हॉस्पिटल म्हणून स्वीकारले आहे. ही आमच्या चांगल्या कामाची पोहोचपावती आहे. आगामी काळात नवनवीन आरोग्य विभाग सुरू करून नागरिकांना दर्जेदार वैद्यकीय सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस आहे.”लाईफकेअर हॉस्पिटलच्या माध्यमातून महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, केंद्र शासनाची ज्येष्ठांसाठी वयोवंदना वैद्यकीय मदत योजना, अपघातजन्य परिस्थितीतील प्रधानमंत्री राहत योजना, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी तसेच विविध शासकीय व खासगी विमा योजनांच्या माध्यमातून रुग्णांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.हॉस्पिटलचे कुटुंबप्रमुख डॉ.विनय पतकी म्हणाले, “डॉ. शिवणकर हे सर्व संचालकांच्या साथीने लाईफकेअर हॉस्पिटलच्या यशात आणि विस्तारात मोलाची भूमिका बजावतील. परिसरातील रुग्णांना दर्जेदार वैद्यकीय सेवा व सुविधा देण्यात ते निश्चितच यशस्वी होतील.” तसेच हृदयरुग्णांना उपचारासाठी मोठ्या शहरांकडे धाव घ्यावी लागू नये, यासाठी हॉस्पिटलमध्ये लवकरच सुसज्ज कॅथलॅब सुविधा सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्यवस्थापिका श्रद्धा खराडे यांनी केले, तर संजय तुपे यांनी आभार मानले.
यावेळी हॉस्पिटलचे फिजिशियन डॉ. सुधाकर अलमद, अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. इंद्रजीत बागल, डॉ. संतोष पाटील, डॉ. संदेश पाटील, डॉ. प्रथमेश जोशी, इन्चार्ज काजल शिंदे, रूपाली पवार, प्रियांका अमृतसागर, विक्रम विरकर यांच्यासह हॉस्पिटलमधील सर्व डॉक्टर, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी डॉ. ज्ञानेश्वर शिवणकर यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या