प्रतिष्ठा न्यूज योगेश रोकडे
मिरज : देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेनुसार आणि माजी मंत्री व विद्यमान आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘हर घर तिरंगा अभियान’ अंतर्गत भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा, सांगली शहरच्या वतीने मिरज येथे तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले.
शिवतीर्थ येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापासून तिरंगा यात्रेला उत्साहात सुरुवात झाली. यामध्ये माजी कॅबिनेट मंत्री तथा पालकमंत्री सांगली जिल्हा आ डॉ सुरेश भाऊ खाडे माजी सैनिक व अधिकारी , महिला मोर्चा पदाधिकारी, सदस्या, मंडल अध्यक्षा, आघाडी व प्रकोष्ठांच्या संयोजिका, नगरसेविका, परिसरातील शाळा तसेच विविध लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले. हातात ३०० फूट तिरंगा ध्वज घेत देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. यावेळी जिल्हाध्यक्षा, भाजपा महिला मोर्चा सांगली शहर स्वातीताई सुशांत खाडे, यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी ‘हर घर तिरंगा’ अभियानाचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविला. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये राष्ट्रप्रेम, देशभक्ती आणि राष्ट्रीय ध्वजाबद्दल सन्मानाची भावना निर्माण करण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.तिरंगा यात्रेत सहभागी झालेल्या सर्व महिला पदाधिकारी, कार्यकर्त्या व नागरिकांचे स्वातीताई सुशांत खाडे यांनी आभार मानले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या