सांगली प्रतिनिधी : मराठी संगीतविश्वात नव्या धाटणीचे गीत घेऊन येणाऱ्या ‘लाखाची सुंदरी’ या मराठी गीताचा प्रकाशन सोहळा गुरुवार, दि. १३ ऑगस्ट रोजी सांगलीत आयोजित करण्यात आला आहे. Sanidhapa Originals प्रस्तुत या गीताच्या प्रकाशन सोहळ्यास संगीतप्रेमी, कलाकार आणि रसिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
‘आपली रीत, आपला अभिमान, आपला प्रवास’ या भावनेला केंद्रस्थानी ठेवत हे गीत साकारण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या संस्कृती, प्रेमभावना आणि मातीशी जोडलेल्या भावविश्वाचे दर्शन या गीतातून घडणार आहे. त्यामुळे नव्या मराठी संगीतप्रेमींसाठी हे गीत विशेष आकर्षण ठरणार आहे.
या गीताचे दिग्दर्शन मयूर राजेश परमार यांनी केले असून निर्मितीची धुरा डॉ. विवेक इंगळे आणि योगिता इंगळे यांनी सांभाळली आहे. वैश्णवी अडोडे आणि रोहन पागारे यांनी गीताला आवाज दिला असून गीतलेखन व संगीत रोहन पागारे यांचे आहे. छायांकन भूषण राजपूत, नृत्यदिग्दर्शन संजय काकडे, संकलन मानसी शिरगावे, क्रिएटिव्ह दिग्दर्शन अभिषेक शिंदे, वेशभूषा मानसी आणि कला दिग्दर्शन अक्षरा परमार यांनी केले आहे. मेकअप व हेअरची जबाबदारी अपेक्षा रोहनकर यांनी सांभाळली आहे.
या गीताचा प्रकाशन सोहळा गुरुवारी सकाळी ११ वाजता संजय भोकरे इन्स्टिट्यूट ऑफ फिल्म मीडिया अँड आर्ट्स, सकाळ पेपर कार्यालयाच्या वस्ती, तिसरा मजला, राम मंदिर चौक, सांगली येथे होणार आहे. रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नव्या मराठी कलाकृतीला प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या