तासगाव:शहरातील बागवान चौक ते बागणे चौक हा प्रमुख रहदारीचा मार्ग सध्या खड्डे,पाणी आणि चिखलाच्या विळख्यात सापडला आहे.या मार्गावर दररोज भाजीपाला व फळ विक्रेते बसतात, तर सोमवार आणि गुरुवारी आठवडी बाजार भरत असल्याने या परिसरात नागरिकांची मोठी गर्दी असते.मात्र रस्त्याची दुरवस्था झाल्याने खरेदीसाठी येणाऱ्या महिला भगिनींसह नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.पावसाळ्यामुळे रस्त्यावरील मोठमोठ्या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असून संपूर्ण मार्ग चिखलमय झाला आहे.या रस्त्यावरून शाळकरी विद्यार्थी-विद्यार्थिनी,व्यापारी,महिला तसेच तालुक्यातील विविध गावांमधून बाजारासाठी येणाऱ्या नागरिकांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे खड्ड्यांतून मार्ग काढताना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.विशेषतः आठवडी बाजाराच्या दिवशी नागरिकांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने या रस्त्याची दुरवस्था अधिकच त्रासदायक ठरत आहे.रस्ता दुरुस्तीची मागणी वारंवार तासगाव पालिका प्रशासनाकडे करूनही अद्याप ठोस कार्यवाही झालेली नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.महिला भगिनी,विद्यार्थी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करून पालिका प्रशासनाने तातडीने या रस्त्यावरील खड्डे बुजवून रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांतून होत आहे.प्रशासन आणखी किती दिवस नागरिकांच्या हालअपेष्टांकडे दुर्लक्ष करणार? असा सवालही उपस्थित केला जात आहे.
तासगावचा बागवान चौक ते बागणे चौक रस्ता खड्ड्यात; महिला भगिनींची रोजची फरफट!
By -
ऑगस्ट १२, २०२६
0
प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या