सांगली प्रतिनिधी : राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, सांगली येथे भारतीय ग्रंथशास्त्राचे जनक पद्मश्री डॉ. एस. आर. रंगनाथन यांची जयंती ‘राष्ट्रीय ग्रंथपाल दिन’ म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांना ग्रंथालय व ग्रंथांचे महत्त्व पटवून देणे हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
कार्यक्रमावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अर्चना शिंदे यांनी डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जीवनकार्याची माहिती देत विद्यार्थ्यांनी नियमित पुस्तक वाचनाची सवय लावून घ्यावी, असे आवाहन केले. यावेळी महाविद्यालयाचे ग्रंथपाल श्री. अमित कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमासाठी स्थानिक व्यवसाय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. अनंत जोशी व डॉ. विश्राम लोमटे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन ग्रंथपाल श्री. अमित कुलकर्णी यांनी केले. प्रा. अबोली पिंजरकर यांनी प्रास्ताविक केले, तर प्रा. किशोर चंदुरे यांनी विशेष सहकार्य केले. विद्यार्थ्यांपैकी कु. तेजस्विनी शिरूर हिनेही कार्यक्रमात सहभाग घेतला.
कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रंथालय, पुस्तकवाचन आणि ज्ञानसंपादनाचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची प्रेरणा निर्माण झाली.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या