प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी: आद्य नाटककार विष्णुदास भावे यांच्या १२५व्या स्मृतिदिनानिमित्त स्मृतीदिनाच्या पूर्वसंध्येला 'नृत्यनाट्यरंग' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अखिल महाराष्ट्र नाट्यविद्यामंदिर समिती, सांगली संचलित नृत्यालय तसेच स्वररत्न म्युझिक अकॅडमीच्या कलाकारांनी तुडुंब भरलेल्या प्रेक्षागृहात हा कार्यक्रम सादर करून रसिकांना अनोखी कलामेजवानी दिली.
नाट्यविद्यामंदिर समितीचे
अध्यक्ष डॉ. शरद कराळे, संचालक विलास गुप्ते, डॉ. भास्कर ताम्हणकर, आर्कि. विवेक देशपांडे, मेधा केळकर, स्वरदा खाडीलकर, बाळकृष्ण यांच्या हस्ते विष्णुदास भावे, विभुते व शशांक लिमये कै. बद्रीप्रसाद कुलकर्णी, कै. रत्नाकर दिवाकर यांच्या प्रतिमांचे तसेच नटराजाचे पूजन करण्यात आले.
'पंचतुंड' या नांदीने सुरू झालेल्या कार्यक्रमात संगीत रंगभूमीवरील अजरामर नाटकांतील नवरसपूर्ण पदरचना गायक कलाकारांनी सादर केल्या. त्यावर कलाकारांनी
केलेले पदलालित्यपूर्ण नृत्य रसिकांची दाद मिळवून गेले. बालकलाकारांचे नृत्य विशेष लक्षवेधी ठरले.
संगीत दिग्दर्शन स्वरदा खाडीलकर, नृत्य मार्गदर्शन बाळकृष्ण विभुते, भूमी देशपांडे व मयुरी माने-विभुते यांनी केले. दिग्दर्शन व प्रकाशयोजना शशांक लिमये यांनी केली.
विविध गायक, नृत्य कलाकार, वादक, तंत्रज्ञ व निवेदकांच्या सहभागातन कार्यक्रम रंगला. आयोजनार समितीच्या पदाधिक व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या