सांगली : लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त गुलमोहर व्यायाम संस्थेच्या सांस्कृतिक विभागातर्फे आयोजित शालेय वक्तृत्व स्पर्धेत दीक्षा संगीता सिद्धार्थ वाघमारे, सेजल गणेश कदम आणि शताक्षी विजय कुलकर्णी यांनी आपापल्या गटात प्रथम क्रमांक पटकावला. डॉ. बापट बाल शिक्षण मंदिर, सांगली येथे ही स्पर्धा उत्साहात पार पडली.
गुलमोहर व्यायाम संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेचे यंदा २७ वे वर्ष होते. सांगलीसह समडोळी, आष्टा, तुंग, हरिपूर, मिरज, माधवनगर व तासगाव परिसरातील विविध शाळांमधील इयत्ता पाचवी-सहावी, सातवी-आठवी आणि नववी-दहावी अशा तीन गटांत तब्बल १९० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
इयत्ता पाचवी-सहावी गट : प्रथम क्रमांक शताक्षी विजय कुलकर्णी (सिटी हायस्कूल, सांगली), द्वितीय माहिरा अकबर फकीर, तृतीय राजनंदिनी जितेंद्र कोरे (दोघी समडोळी हायस्कूल, समडोळी). उत्तेजनार्थ स्वराली सागर नायकुडे व ईश्वरी जयंती पाटील (दोघी कांतीलाल शहा प्रशाला, इंग्रजी माध्यम) यांची निवड झाली.
इयत्ता सातवी-आठवी गट : प्रथम सेजल गणेश कदम (सुंदराबाई शं. मालू इंग्लिश मीडियम स्कूल, हरिपूर), द्वितीय प्रांजली तानाजी सावंत (प्रज्ञा प्रबोधिनी प्रशाला, सांगली), तृतीय सुयोग सचिन गोखले (पटवर्धन हायस्कूल, सांगली). उत्तेजनार्थ परिमल संतोष टिळे (चंपाबेन शहा विद्यामंदिर, तासगाव) व प्रांजल प्रसाद कुलकर्णी (सुंदराबाई शं. मालू इंग्लिश मीडियम स्कूल, हरिपूर) यांची निवड झाली.
इयत्ता नववी-दहावी गट : प्रथम दीक्षा संगीता सिद्धार्थ वाघमारे (दामाणी हायस्कूल, सांगली), द्वितीय कौस्तुभ विशाल गळतगेकर (प्रज्ञा प्रबोधिनी प्रशाला, सांगली), तृतीय वृंदा विशाल खेराडकर (चंपाबेन शहा विद्यामंदिर, तासगाव). उत्तेजनार्थ ओम अभिजीत जनमदग्नी व श्रेया अविनाश दीक्षित (दोघे प्रज्ञा प्रबोधिनी प्रशाला, सांगली) यांची निवड झाली.
स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून संभाजी दाणेकरी, आनंदराव जाधव, राजश्री देखणे, जयश्री तेली, प्रियंका चिवटे व मिथिला कुंभार यांनी काम पाहिले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कार्यवाह मिलिंद कुलकर्णी, सहकार्यवाह सुशांत निकम, मुकुंद काळे, विनायक देशमुख, श्वेता महाजन, कीर्ती सोळांकुरकर, सृष्टी शिंदे, अंकिता सरगर, श्रेया शिंदे, सानवी कदम आदींनी परिश्रम घेतले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या