प्रतिष्ठा न्यूज
हरिपूर :सांगली जिल्हा वायरमन युनियनच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त तसेच क्रांती दिनाचे औचित्य साधून रविवार, दि. ९ ऑगस्ट रोजी हरिपूर येथे ‘रक्तदान हेच श्रेष्ठदान’ या उदात्त हेतूने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.यावेळी युनियनच्या माध्यमातून राबविण्यात येणारे विविध उपक्रम, सभासदांना मिळणारे फायदे तसेच सामाजिक बांधिलकीविषयी मार्गदर्शन करण्यात आले. विशेष म्हणजे रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना पाच लाख रुपयांचे विमा संरक्षण काढून देण्यात आले.
सांगली जिल्हा वायरमन युनियनच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबविण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणून रक्तदान शिबिराचे नियोजन करण्यात आले होते. युनियनच्या पदाधिकारी, सभासद तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा उपक्रम उत्साहात पार पडला.यावेळी युनियनचे अध्यक्ष अविनाश कदम, उपाध्यक्ष झाकीर पखाली, खजिनदार वसीम लांबे, राहुल मिसाळ, दीपक शिंदे, प्रथमेश माळी, अनिकेत अंबरुळे, प्रशांत संकपाळ, महेश करजगार, खंडू वाघमारे यांच्यासह युनियनचे पदाधिकारी, कमिटी मेंबर, सभासद व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व रक्तदात्यांचे तसेच उपस्थितांचे युनियनच्या वतीने आभार मानण्यात आले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या