प्रतिष्ठा न्यूज
सांगली/मिरज दि.१०: ग्रामीण भागातील जनतेला दर्जेदार आणि मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने, गुलाबराव पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल (मिरज) आणि पृथ्वीराज पाटील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हरिपूर ग्रामपंचायत (सांगली) येथे मोफत होमिओपॅथिक उपचार केंद्र बाह्य रुग्ण विभागाचे (OPD) भव्य उद्घाटन संस्थेचे संस्थापक चेअरमन पृथ्वीराजबाबा पाटील यांच्या हस्ते व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले.
हरिपूर व परिसरातील नागरिकांना आता या केंद्राच्या माध्यमातून दर सोमवारी हरीपूर येथे मोफत वैद्यकीय सल्ला आणि होमिओपॅथिक उपचार जागेवरच उपलब्ध होणार आहेत.
याप्रसंगी बोलताना संस्थापक चेअरमन पृथ्वीराज पाटील यांनी सांगितले की, "सर्वसामान्य आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांपर्यंत वैद्यकीय सेवा पोहोचवणे हे आमचे मुख्य ध्येय आहे. या उपचार केंद्रामुळे हरिपूर गावातील नागरिकांची आरोग्यविषयक सोय होणार आहे."
या सोहळ्याला कॅम्पस को-ऑर्डिनेटर डॉ. सतिश पाटील, प्राचार्य डॉ. प्रताप भोसले, डॉ. राजेंद्र मेथे, उपप्राचार्य डॉ. सुहास पाटील, डॉ. तझीन बिडीवाले, डॉ. वैशाली यादव, डॉ. जमीर तांबोळी आणि डॉ. प्रिती कांबळे उपस्थित होते. तसेच रुग्णालयाचे सर्व इंटर्नशिप डॉक्टर्स आणि हॉस्पिटल स्टाफने रुग्णांच्या सुविधेसाठी विशेष परिश्रम घेतले.
स्थानिक प्रशासनाच्या वतीने हरिपूरच्या सरपंच राजश्रीताई तांबवेकर, उपसरपंच सुनिता शेरीकर, जिल्हा परिषद सदस्य अनिलभाऊ तांबवेकर, ग्रामपंचायत सदस्य युवराज गोंधळी, शर्वरी रांजने, संभाजी सुर्यवंशी, माजी सदस्य सतिश खंडागळे आणि ग्रामपंचायत अधिकारी कल्पना राठोड यांच्यासह गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
या मोफत उपचार केंद्राचा हरिपूर व परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
On Sat, 8 Aug, 2026, 5:10 pm NILESH GHORPADE, <nilesh571979@gmail.com> wrote:
गुलाबराव पाटील होमिओपॅथीक मेडिकल कॉलेजचा विद्यार्थी डॉ. अभिजीत डुबल महाराष्ट्रात प्रथम
बीएचएमएस अंतिम वर्षात सर्वसाधारण प्रथम क्रमांकासह सुवर्णपदक; रेपरटरी व प्रॅक्टिस ऑफ मेडिसिनमध्येही प्रथम क्रमांकासह सुवर्णपदक
मिरज दि.८: गुलाबराव पाटील होमिओपॅथीक मेडिकल कॉलेजचा विद्यार्थी डॉ. अभिजीत साहेबराव डुबल याने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्या हिवाळी २०२३ अंतिम वर्षाच्या होमिओपॅथीक पदवी (बीएचएमएस) परीक्षेत संपूर्ण महाराष्ट्रातून सर्वसाधारण प्रथम क्रमांक मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
तसेच रेपरटरी आणि प्रॅक्टिस ऑफ मेडिसिन या विषयांमध्येही प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णपदकाचा मान पटकावला.
या उल्लेखनीय यशाबद्दल दि. २८ जुलै २०२६ रोजी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक येथे झालेल्या २५ व्या दीक्षांत समारंभात महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल तथा कुलपती मा. जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते डॉ. अभिजीत डुबल यांचा गौरव करण्यात आला.
डॉ. अभिजीतच्या या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक चेअरमन पृथ्वीराज पाटील, कार्यकारी विश्वस्त ॲड. वीरेंद्रसिंह पाटील, सर्व विश्वस्त, कॅम्पस कोऑर्डिनेटर, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी संस्थापक चेअरमन पृथ्वीराज पाटील म्हणाले, “आज संस्थेच्या मुकुटामध्ये अभिजीतने एक हिरा लावला आहे. त्याने मिळवलेले हे यश संपूर्ण संस्थेसाठी अभिमानाची बाब आहे. हीच यशाची आणि गुणवत्तेची परंपरा आमचे पुढील विद्यार्थीही कायम राखतील.” असे सांगत त्यांनी डॉ. अभिजीत डुबल याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
डॉ. अभिजीत डुबलच्या या दैदिप्यमान यशामुळे गुलाबराव पाटील होमिओपॅथीक मेडिकल कॉलेजच्या शैक्षणिक गुणवत्तेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या