प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचे आज तासगाव शहरातील वरचे गल्ली परिसरात उत्स्फूर्त आणि जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने मराठा समाजातील तरुण उपस्थित होते. जरांगे पाटील यांच्या आगमनाने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.जरांगे पाटील यांनी जिजाऊ चौक येथे राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत त्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली.‘मनोज जरांगे पाटील आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या विचारांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे काम जरांगे पाटील करीत असल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.
मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठविणारे जरांगे पाटील यांचे तासगाव शहरातील आगमन तरुणांसाठी विशेष आकर्षण ठरले. त्यांच्या स्वागतासाठी शहरातील विविध भागांतून मोठ्या संख्येने तरुण आणि समाजबांधव उपस्थित होते.
तासगाव शहर मराठा समाजाच्या वतीने आयोजित या स्वागत सोहळ्याला मोठी गर्दी झाली,जरांगे पाटील यांच्या उपस्थितीने मराठा समाजात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या