सांगली : मराठी संगीतविश्वात नव्या धाटणीचे गीत घेऊन आलेल्या ‘लाखाची सुंदरी’ या मराठी गीताचा प्रकाशन सोहळा गुरुवारी, दि. १३ ऑगस्ट रोजी सांगलीत उत्साहात पार पडला. सानिधपा ओरिजिनल्स प्रस्तुत या गीताच्या प्रकाशन सोहळ्यास संगीतप्रेमी, कलाकार आणि रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नव्या मराठी कलाकृतीला प्रोत्साहन दिले.
‘लाखाची सुंदरी’ हे प्रेम, सौंदर्य आणि मनाला भावणाऱ्या भावनांवर आधारित गीत आहे. या गीताचे दिग्दर्शन मयूर राजेश परमार यांनी केले असून निर्मितीची जबाबदारी डॉ. विवेक इंगळे व योगिता इंगळे यांनी सांभाळली आहे. गीतलेखन, संगीत आणि संगीत संयोजनाची जबाबदारी रोहन पागारे यांनी पार पाडली आहे. वैष्णवी अडोदे व रोहन पागारे यांनी गीताला स्वर दिला आहे.
गीताच्या छायाचित्रणाची जबाबदारी भूषण राजपूत, नृत्यदिग्दर्शन संजय काकडे, क्रिएटिव्ह दिग्दर्शन अभिषेक शिंदे, संकलन मानसी भुसारी, कलादिग्दर्शन अक्षरा परमार, मेकअप व हेअरची जबाबदारी शालिनी राजपूत व अपेक्षा रोहनकर यांनी सांभाळली.
या गीतात संजय काकडे, अमृता काकडे आणि आर्यन काकडे यांनी भूमिका साकारल्या आहेत. अदिती पाटील, समृद्धी वाघमोडे, स्नेहल पवार, साक्षी पाटील, सूरज गिडवणी, वैदेही जाधव, गौतमी कर्नाले आदी कलाकार व नृत्यकलावंत सहभागी झाले आहेत.
सिने कलाकार उमाकांत पाटील, सिने नृत्यदिग्दर्शक सुमित साळुंखे तसेच कॉर्पोरेट कोरियोग्राफर संदीप डमढेरे यांचीही उपस्थिती होती. कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांनी ‘लाखाची सुंदरी’ या गीताला शुभेच्छा देत मराठी संगीत क्षेत्रातील नव्या प्रयोगांचे स्वागत केले.
गीताचा प्रकाशन सोहळा गुरुवारी सकाळी ११ वाजता संजय भोकर इन्स्टिट्यूट ऑफ फिल्म मीडिया अँड आर्ट्स, तिसरा मजला, राम मंदिर चौक, सांगली येथे झाला. या वेळी रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नव्या मराठी गीताला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या